Bad Foods For Bones : या चुकीच्या पदार्थांमुळे होते हाडांचे नुकसान, आतून होतात पोकळ; तुम्ही देखील करताय का आहारात याचा समावेश?

Which foods affect your bones : वाढत्या वयाबरोबर हाडांचे कमकुवत होणे साहाजिक आहे. पण आजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे तरुणांचे हाडे कमकुवत होत आहेत.
Bad Foods For Bones
Bad Foods For BonesSaam tv
Published On

Foods That Are Bad For Your Bone Health :

हिवाळ्यात आपल्या अधिक प्रमाणात हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हाडे दुखी, सांधेदुखी किंवा गुडघे दुखीचा त्रास सहन करावा लागतो. शरीर तेव्हाच निरोगी राहाते जेव्हा तुम्ही आतून निरोगी असता. शरीराला अधिक बळकट बनवण्याचे काम हाडांची भूमिका असते.

वाढत्या वयाबरोबर हाडांचे कमकुवत होणे साहाजिक आहे. पण आजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे तरुणांचे हाडे कमकुवत होत आहेत. हाडे कमकुवत झाल्यामुळे शरीरात वेदना आणि जडपणा जाणवतो. यामुळे बरेचदा उठताना आणि बसताना त्रास होतो. आहारात चुकीच्या पदार्थाचा समावेश केल्यास त्याचा हाडांवर परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही देखील हे पदार्थ खात असाल तर आजपासून खाणे बंद करा.

1. कॅफेनचे अधिक प्रमाणात सेवन

अनेकांना सकाळी उठल्यावर कॉफी (Coffee) पिण्याची सवय असते. काहींची सकाळ तर कॉफीशिवाय अपूर्णच असते. कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते. कॉफीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास हाडांमधील कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यासाठी कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.

Bad Foods For Bones
Kidney Health: हात-पाय सतत सूजतात? असू शकते किडनी खराब, ही लक्षणे दिसातच व्हा सावध

2. मीठाचे सेवन

काही लोकांना जेवणात अधिक प्रमाणात मीठ खाण्याची सवय असते. तसेच अनेकांना प्रीझव्ह केलेल पदार्थ (Food) खाण्याची सवय असते. यामध्ये अधिक प्रमाणात मीठ असते. जास्त मीठ खाल्ल्याने कॅल्शियम हे लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.

3. सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने तुमची हाडे आतून कमकुवत होऊ लागतात. यामध्ये अधिक प्रमाणात सोडा असतो. याचे सेवन अधिक झाल्यास रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढते. त्यामुळे हाडांना पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.

Bad Foods For Bones
Weak Bones : खाण्यापिण्याच्या या चुकीच्या सवयींमुळे हाडं होतात ठिसूळ, या पदार्थांना आज करा डाएटमधून आउट

4. अल्कोहोलचे सेवन

जर तुम्ही देखील अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या हाडांना नुकसान होऊ शकते. अल्कोहोलमुळे कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. यामुळे शरीराची हानी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com