छत्तीसगडच्या बीजापूर आणि तेलंगणा सीमेवर सुरक्षादलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठं ऑपरेशन लॉन्च केलं आहे. या ऑपरेशनमध्ये ४००० हून अधिक जवान सहभागी झाले आहेत. या जवानांनी ३०० हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. त्यात नक्षली लीडर हिडमा, देवा, सुधाकर यांचा समावेश आहे. जवानांनी करागेट्टा, नाडंपल्ली, पुजारी कांकेरच्या डोंगरावरील नक्षलवाद्यांना जवानांनी घेरलं आहे.
गेल्या ४८ तासांपासून ऑपरेशन सुरु आहे. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार होत आहे. या ऑपरेशनमध्ये तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड या तिन्ही राज्याचे पोलीस सहभागी झाले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे जवान देखील सावधपणे पावले उचलत आहेत.
या भागात नक्षलवाद्यांच्या बटालियन नंबर १ आणि २ सहित नक्षलवाद्यांच्या अन्य कंपन्या देखील पोहोचल्या आहेत. सूर्य आग ओकत असताना जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. ऑपरेशनदरम्यान ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जवानांनी एका आठवड्याचं रेशन ऑपरेशनसाठी जवळ ठेवलं आहे.
छत्तीसगड सीमेवरील ऑपरेशनला तेलंगणातून मॉनिटर केलं जात आहे. आयजी सुंदरराज पी आणि बीजापूर एसपी जिंतेंद्र यादव नजर ठेवून आहेत. ऑपरेशनमध्ये अनेक हायटेक वस्तूंचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील गृहमंत्र्यांचं संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष आहे. तिन्ही राज्यातील समन्वय समितीने एकत्र ऑपरेशन लॉन्च केलं आहे. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचं नेटवर्क तोडलं आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांसमोर रेशन आणि मेडिकलच्या समस्या निर्णाण झाल्या आहेत.
चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला मोठं यश मिळत आहे. दुसरीकडे नक्षलवाद्यांनी चारी बाजूला आयइडी प्लॉंट केला आहे. याबाबत ग्रामस्थांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जवानांकडून नक्षलवाद्यांवर मोठा प्रहार केला जात आहे. या ऑपरेशनबाबत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.