Gujarat Shocking News Saam Tv
देश विदेश

Shocking: दागिन्याच्या कारखान्यात मोठी दुर्घटना, विषारी गॅसमुळे ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Surat Jewellery Factory: गुजरातमध्ये दागिन्याच्या कारखान्यात मोठी दुर्घटना घडली. सेफ्टिंक टँक साफ करताना विषारी गॅसमुळे ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Priya More
  • सूरतमधील दागिने बनवणाऱ्या कारखान्यात मोठी दुर्घटना

  • विषारी गॅसमुळे ४ जणांचा मृत्यू झाला

  • सेफ्टिक टँक साफ करताना घडली घटना

  • अग्निशमन दलाने चौघांना बाहेर काढून रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले

गुजरातच्या सूरत जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. दागिने बनवण्याच्या कारखान्यामध्ये ४ मजुरांचा मृत्यू झाला. सूरत शहरातील अश्विनी कुमार भागात ही घटना घडली. दागिने बनवणाऱ्या कारखान्यात विषारी गॅसने या चौघांचा बळी घेतला. कारखान्यातील मजूर सेफ्टिक टँक साफ करत होते त्यावेळी ही घटना घडली. विषारी गॅसमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी वराछा साखर बाजाराजवळील ईटीपी प्लांटमध्ये ही घटना घडली. चार मजूर सेफ्टिंक टँक साफ करण्यासाठी गेले होते. साफसफाई करत असताना टाकीमधील विषारी वायूमुळे त्यांना अचानक गुदमरल्यासारखे झाले. विषारी वायूच्या तीव्र परिणामामुळे ते चारही कामगार टँकमध्येच बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी ही घटना घडली. अग्निशमन दलाला एका सेफ्टिक टँकमध्ये एक माणूस अडकल्याचा फोन आला. मात्र, काही मिनिटांतच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले तेव्हा त्यांना टाकीत एक नव्हे तर चार जण बेशुद्ध आणि गंभीर अवस्थेत आढळले. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने चारही जणांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दागिन्याच्या कारखान्यात असलेल्या सेफ्टिक टँकची दर दोन महिन्यांनी साफसफाई केली जाते. त्यामध्ये जमा झालेला कचरा काढला जातो. या सेफ्टिक टँकमध्ये आज सकाळी सुपरवाइजर आणि ३ मजूर साफसफाईसाठी उतरले. या टँकमध्ये आधीच विषारी गॅस भरलेला होता. या विषारी गॅसमुळे टँकमध्ये उतरलेले चौघेही बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कारखान्यात एकच गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revas-Reddi Highway : कोकणचा ‘गेमचेंजर’ पूल; रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे वाहतूक वेगवान होणार

Maharashtra News Live Update: सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती आणखी वाढणार? तीन महिन्यात दोनदा का वाढले दर?

पावसाळ्यात घरात काय बसता? महाराष्ट्रातील 'हे' सुंदर घाट बघतायत तुमची वाट; आजच प्लॅन करा पावसाळी ट्रिप!

एकनाथ शिंदे यांची विदर्भात ताकद वाढली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT