Shocking : मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Gurugram Metro Sucide News : गुरुग्रामच्या एमजी रोड मेट्रो स्टेशनवर २२ वर्षीय तरुणीने मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिस तपास करत आहेत.
22-YEAR-OLD WOMAN DIES AFTER JUMPING BEFORE METRO TRAIN AT GURUGRAM MG ROAD STATION
22-YEAR-OLD WOMAN DIES AFTER JUMPING BEFORE METRO TRAIN AT GURUGRAM MG ROAD STATIONSaam tv
Published On
Summary
  • मेट्रो स्टेशनवर २२ वर्षीय तरुणीची मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या

  • घटनेमुळे मेट्रो सेवा सुमारे ३० मिनिटे विस्कळीत

  • घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही

  • पोलिसांकडून तपास सुरू

हरियाणातील गुरुग्राममधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एम.जी. रोड मेट्रो स्टेशनवर २२ वर्षीय तरुणीने मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ऑफिसमधील ताणतणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली असून मेट्रो सेवाही सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव वर्षा असे असून ती दिल्लीतील अयानगर परिसरातील रहिवासी होती. वर्षा गुरुग्राममधील एम.जी. रोड मेट्रो स्टेशनजवळील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती कामावरून घरी जात होती. यादरम्यान तिने एम.जी. रोड मेट्रो स्टेशनवर दिल्लीकडे जाणारी मेट्रो येत असताना अचानक रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले.

22-YEAR-OLD WOMAN DIES AFTER JUMPING BEFORE METRO TRAIN AT GURUGRAM MG ROAD STATION
Gold Rate Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात ४,६९० रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

कोणीतरी मेट्रो समोर येत असल्याचे चालकाचे लक्षात आल्याने, मेट्रो चालकाने तातडीने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या अपघातात वर्षाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मेट्रो प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली आणि अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

22-YEAR-OLD WOMAN DIES AFTER JUMPING BEFORE METRO TRAIN AT GURUGRAM MG ROAD STATION
Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

पोलीस अधिकारी संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर कुटुंबीयांना मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. तपासादरम्यान घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तरुणीच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com