Ind vs NZ : टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन बदलण्याची शक्यता; सिराज, जडेजाला संधी की पुन्हा बाकावरच बसणार

ind vs nz second test india probable playing eleven : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना २७ नोव्हेंबरला ख्राईस्टचर्चमध्ये सुरू होणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? दुसऱ्या कसोटीत भारताची 'टेस्ट'saam tv
Published On: 

स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज आणि स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांना संधी न मिळणे, पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अखेरची कसोटी निर्णायक आहे. हा सामना जिंकणारा संघ ही कसोटी मालिकाही जिंकेल. तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ही मालिका आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकाही खिशात घालणे अत्यंत महत्वाचे आहे. आता दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? मोहम्मद सिराज आणि जडेजा यांना संधी मिळणार का, असा प्रश्न टीम इंडियाच्या चाहत्यांना पडला आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वात न्यूझीलंडमध्ये टीम इंडिया मैदानात उतरली. पहिल्या कसोटीत स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जडेजा या दोघांना संधी मिळाली नाही. यावरून भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर, तसेच मुख्य प्रशिक्षकावर जोरदार टीका झाली होती. अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. भारतानं पहिल्या कसोटीवर वर्चस्व मिळवलं होतं. पण ऐनवेळी गोलंदाजी घसरली आणि हा सामना भारताच्या हातून निसटला. अंशुल कंबोज आणि आकाश दीप या दोघांवर वेगवान गोलंदाजीची धुरा होती. प्रमुख गोलंदाज सिराज बाकावर होता. याबाबत व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

सुंदर, आकाशदीपचं काय होणार?

दुसरा कसोटी सामना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यात सिराज खेळणार की नाही, हे दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आल्यानंतरच कळू शकेल. मात्र, सिराजला संधी मिळाली तर, आकाश दीप किंवा अंशुल कंबोज या दोघांपैकी एकाला बाकावर बसावे लागेल. प्रसिद्ध कृष्णाला बाकावर बसवण्याची शक्यता धुसर आहे. पहिल्या कसोटीत त्यानं चांगली कामगिरी केली नसली तरी, व्यवस्थापन त्याला आणखी संधी देऊ शकतं. तसेच रवींद्र जडेजाचं संघात पुनरागमन झालं तर, वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग ११ मधून बाहेर जावे लागेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग ११

शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज किंवा मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
Mumbai Indians: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा डाव, कर्णधारपदाबाबत एका फोटोमधून दिले महत्त्वाचे संकेत!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.