Masala Papdi : बाजारातील पापडी विसरा! गव्हाच्या पिठापासून बनवा कुरकुरीत मसाला पापडी, चहासोबत लागेल भारी

Saam Tv

कुरकुरीत चटपटीत पापडी?

गव्हाच्या पिठापासून तयार होणारी ही चहासोबत खाल्ली जाणारी मसाला पापडी घरीच बनवा ही चविष्ट रेसिपी संध्याकाळच्या चहाची मजा करेल दुप्पट.

masala papdi recipe | pinterest

साहित्य

२ वाट्या गव्हाचे पीठ,२ चमचे तेल किंवा तूप, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ,थोडे कसुरी मेथी,आवश्यकतेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल

masala papdi recipe | pinterest

सर्वप्रथम तयार करा पीठ

एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात ओवा, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ आणि कसुरी मेथी घाला. त्यानंतर तेल किंवा तूप टाकून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

masala papdi recipe | pinterest

पीठ मळून घ्या

आता थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पापडी कुरकुरीत होण्यासाठी पीठ फार मऊ करू नका. मळलेले पीठ काही वेळ झाकून बाजूला ठेवा.

masala papdi recipe | pinterest

लाटून पुरी बनवा

मळलेल्या पिठाचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळा पोळीप्रमाणे पातळ लाटून घ्या. त्यानंतर सुरीने किंवा कटरने छोटे गोल अथवा चौकोनी तुकडे कापून घ्या.

masala papdi recipe | pinterest

पापडीला हलके टोचे द्या

कापलेल्या पापडीला काट्याने हलके टोचे द्या. यामुळे तळताना पापडी फुगण्याची शक्यता कमी होते. सर्व पापड्या तयार करून एका ताटात ठेवा.

masala papdi recipe | pinterest

गरम तेलात तळून घ्या

कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर पापड्या त्यात सोडा. मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. त्यानंतर टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.

masala papdi recipe | pinterest

तयार आहे चटपटीत मसाला पापडी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत मसाला पापडी सर्व्ह करा. एकदा बनवल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या आणि हवाबंद डब्यात साठवा. संध्याकाळच्या चहासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा उत्तम खमंग नाश्ता ठरेल

masala papdi recipe | pinterest

NEXT : कमी उंचीची चिंता सोडा! हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या 5 फॅशन ट्रिक्स

fashion secrets for petite women | saam tv
येथे क्लिक करा