Mathura Accident Saam Tv
देश विदेश

Accident: भीषण अपघात! ११ वाहनं धडाधड धडकली, नंतर पेटली; १३ प्रवासी जिवंत होरपळले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Mathura Accident: उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये भयंकर अपघात झाला. ११ वाहनांनी एकमेकांना धडक देत पेट घेतला. या घटनेत १३ प्रवासी जिवंत जळाले. तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात

  • ८ बस आणि ३ कारची एकमेकांना धडक

  • वाहनांना आग लागल्याने अनेक प्रवासी जिवंत जळाले

  • अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी

मथुरामध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. दाट धुक्यांमुळे यमुना एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला. ८ बस आणि ३ कार एकमेकांवर धडकल्या. अपघातानंतर वाहनांना आग लागली. या आगीमध्ये होरपळून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

ही घटना बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२७ किमी माइलस्टोनजवळ झाला. मध्यरात्री ३.३० वाजता ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की झोपेमध्येच अनेकांचा जीव गेला. दाट धुक्यांमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दाट धुक्यांमुळे एक एक करत ८ बस आणि ३ कारची जोरदार धडक झाली. अपघातानंतर अनेक वाहनांनी पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून अनेक प्रवाशांचा जीव गेला. वाहनांना आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. घटनास्थळी किंचाळ्या, आग अन् धुराचे लोट पसरले होते.

अग्निशमन दलाने घटानास्थळी धाव घेत आग विझवली आणि जखमींना बाहेर काढले. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळावरून १७ बॅगमध्ये हाडांचे सांगाडे आणि जळालेले मृतदेह घेऊन गेले. मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे. ४ जणांची ओळख पटली आहे तर इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

जखमींना मथुरा येथील जिल्हा रुग्णालय आणि वृंदावन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. ३८ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३९ जणांना बलदेव सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT