Worli Hit and Run Case Saam tv
मुंबई/पुणे

Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाची मोठी कारवाई; मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी, VIDEO पाहा

Mumbai Worli Hit and Run News : मुंबई वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणाने राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा हे शिंदे गटातील अधिकारी आहेत. यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून शिंदे गटाला लक्ष्य केले जात आहे. यानंतर शिंदे गटाने मिहीर शहा याच्या वडिलांवर मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटाने मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मुंबईत वरळीत झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी मिहीर शाहने कार चालवत महिलेला धडक दिली. अपघातानंतर त्याने महिलेला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. तर या अपघातात महिलेचा पतीही जखमी झाला. या भीषण अपघातानंतर महिलेने घटनास्थळावरुन पळ काढला.

या भीषण अपघात प्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली होती. २४ वर्षीय मिहीर शाहला मंगळवारी अटक करण्यात आली. पण कोर्टाने राजेश शहाला जामीनही मंजूर केला. आज त्यांच्याविरोधात पक्षाने मोठी कारवाई केली आहे.

कोण आहेत राजेश शाह?

राजेश शाह हे शिंदे गटाचे उपनेते होते. राजेश शाह यांच्या मुलाने रविवारी सकाळी दाम्पत्याला उडवले होते. राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाहने महिलेला फरफटतही नेलं होतं. या भीषण प्रकारात महिलेचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर मिहीरने वडील राजेश शाहला फोन केला होता. त्यानंतर राजेश शाह यांनी मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच कारचालक राजऋषी बिडावत याला जबाबदारी घेण्यास सांगितल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी राजेश शाह आणि ड्रायव्हर राजकृषीला अटक केली होती. त्यानंतर राजेश शाहला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर ड्रायव्हरला पोलीस कोठडी सुनावणी आली होती. या प्रकरणी कोर्टाने राजेश शाह यांची अटक बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतर कोर्टाने राजेश शाह यांना जामीन मंजूर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT