मुंबई : रविवारी पहाटे झालेल्य हिट अँड रन प्रकरणावरून आज पुन्हा एकदा विधिमंडळात वातावरण तापले. वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून जोरदारपणे केला गेला. राज्यातील 'हिट अॅड रन' स्थिती बाबत सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं तर आपली बाजू सांभाळताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिट अॅड रन च्या कशा तक्रारी आल्या याबाबत सरकारच्या नेत्यांनीही पाढा वाचला. त्यामुळे हिट अँड रन प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.
राज्यात हिट अँड रन यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना बघायला मिळते . गेल्या 30 दिवसांमध्ये जवळपास चार ते पाच घटना घडल्यात. मात्र या प्रकरणांवर आळा सरकारला घालता येत नाही असे आरोप विरोधकांकडून सातत्याने सरकारवर होताना बघायला मिळतात. पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच वरळीतील हिट अँड रन प्रकरणामुळे सरकारची अडचण आणखी वाढली.
वरळीतील या प्रकरणामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांची अडचण निर्माण झाली कारण आरोपी हा शिवसेनेचा पालघरचा उपनेता असल्यामुळे शिवसेनेला सर्वात जास्त टीकेला सामोरे जावे लागला. आरोपी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय असला तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्यामुळे शिवसेनेला देखील ट्रोल करण्यात आलं.
वरळीच्या या प्रकरणांमध्ये तब्बल 48 तासानंतर आरोपी मिहीर शहाला अटक करायला पोलिसांना यश मिळालं. मात्र या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणी निर्माण करण्यास महाविकास आघाडीला यश आलं. विधानभवनातील दोन्ही सभागृहामध्ये हे प्रकरण गाजले. त्यामुळे एकूणच हिट अँड रन प्रकरणामुळे विरोधकांना प्रश्नांची फ्री हिट मिळाली तर अवघड प्रश्नांवर फार उत्तरांची सरबती करता न आल्याने मुद्द्यापासून काही प्रमाणात पळ काढावा लागल्याचा दिसून आले.
भाजप नेते नितेश राणे म्हणाले, आमच्या महायुती सरकाराच्या काळात हिट अँड रनच्या दोन केसेस घडल्या आहेत. या दोन्ही केसेस मध्ये आरोपी कोणाचा आहे किती श्रीमंत आहे हे न बघता कुठलीही तडजोड न करता कारवाई केली जात आहे. पुण्यात स्वतः गृहमंत्री फडणवीस तिथे गेले होते. वरळीमध्ये सुद्धा मिहीर शाह वर कारवाई केली जाईल. आमचा सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे कारवाई करणार आहे. जो आरोपी बिळात बसलाय, त्याला आम्ही शोधून काढणार आहे. आमच्यावर आरोप करण्यावर एकदा बघावं की महाविकास आघाडीच्या काळात काय झालं? दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरणात नेमकं काय आलं? त्यात एवढी तत्परता का दाखवली नाही? त्यात मुख्यमंत्री यांचा मुलगा होता म्हणून मस्टरचे कागद फाडले'.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, हिट अँड रन प्रकरणांमध्ये सरकार कोणालाही सोडणार नाही, मग ते कितीही थोडक्यात जरी असते. तरी कारवाई सरकार करणारच आहे. विरोधी पक्षाने केवळ तास मोजत बसू नये. आम्ही कारवाई करतो हे पाहावे'.
मंत्री राज्य उपादान शुल्क शंभूराजे देसाई म्हणाले, 'राज्य शुल्क आयोगातर्फे अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय घेण्यात आले आहेत. फ्लाइंग स्कोड देखील नेमलेले आहेत. सरप्राईज व्हिजिट म्हणजेच धाडसत्र देखील केला जाणार आहे. अनेक बार आणि पबवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून हे कॅमेरे लावणं जेणेकरून जे कोणी पगारमध्ये येतील, त्यांचं वय त्या ठिकाणी दिसलं जाईल. अल्पवयीन मुलांना पब्ज आणि बारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात अनेक पोलीस प्रशासन ठिकठिकाणी उपलब्ध असतं ते देखील यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या प्रकरणात कलम 302 आणि कलम 103 लावण्यात यावा. गुन्हा घडून जवळपास दोन ते तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे आता मेडिकल केले तरी त्याने मद्य प्राशन केले आहे का? हे कसे कळेल आणि त्याचबरोबर आतापर्यंत जेवढ्या हिट अँड रन केसेस झाल्या त्या प्रत्येकामध्ये सीसीटीव्ही हे देण्यात आले .मात्र आता प्रमोद नाखवा यांना अजून पर्यंत सीसीटीव्ही का देण्यात आले नाहीत .त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मुंबई पोलिसांचा क्रमांक हा जगात स्कॉटलंड नंतर लागतो त्यामुळे तशी गनिमा राखली गेली पाहिजे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
'वरळीमध्ये जी घटना झाली, ती भयानक घटना झाली. ती हिट अँड रन नाही, तर हत्येची केस आहे. याला हत्येची केस म्हणून हाताळलं पाहिजे. ६० तास मिहीर शाह कुठे होता? याच उत्तर द्यावं. गेल्यानंतर माल कळलं कोणाचा तिथे काय कनेक्शन आहे. कृत्य करून तो मिहीर शाह पळून कसा जातो . गृहमंत्री काय करताय? गृहविभाग काय करतंय? कोण कोणच्या मागे आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.