Worli Hit and Run Case Video: वरळी हिट अँड रन प्रकरणी पहिली मोठी कारवाई; जुहूतील तापस बारवर फिरवला बुलडोझर
संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित बार सील केला आहे. तसेच जुहूमधील तापस बार सील केल्यानंतर त्याच्यावर बुलडोझर फिरवला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आरोपी मिहीर याच बारमध्ये रविवारी रात्री होता. पालिकेच्या अतिक्रमण निष्काशन विभागाने त्याच बारच्या अतिक्रमणावर कारवाई सुरु केली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर जागामालकाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. याच अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे.
बार मालकाने काय म्हटलंय?
तापस बारच्या मालकाने मोठा खुलासा केला. मालकाने म्हटलं की, 'रविवारी मिहीर याच्यासोबत चार जणांनी रात्री ११.०८ वाजता बारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बारमध्ये जेवण आणि दारु प्यायले. त्यानंतर बारमधून निघाले. त्यावेळी मिहीर दारु प्यायला नव्हता. त्यानं फक्त रेड बुल प्यायलं होतं. मात्र, एका खुलाशात या मिहीर आणि त्याच्या मित्रांनी बारमध्ये १८ हजारांहून अधिक रुपयांचं बील केले. मात्र, या बारच्या मालकाने उलट दावा केलाय'.
कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
२४ वर्षीय मिहीरने रविवारी मिहीर शाह याने कार चालवताना महिलेला जोरदार धडक दिली. वरळीत प्रदीप नखवा दुचाकी चालवत होते. त्याच्या दुचाकीवर मागे त्यांची पत्नी कावेरी बसल्या होत्या. पोलिसांनी अपघातास्थळाहून १० किलोमीटर अंतरावर कार जप्त केली. या अपघातात महिलेच दुर्देवी मृत्यू झाला. बारमधील पार्टीनंतर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईसाठी मिहीर शाहच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केलं होतं.
शिंदे गटाकडून राजेश शाह यांच्यावर कारवाई
मिहीर शाहचे वडील , शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्यावर शिंदे गटाने कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राजेश शाह यांच्यावर कारवाई केली आहे. राजेश शाह यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.