Lasalgaon Accident : दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना अपघात; सीमा शुल्क विभागाचा चालक ठार, २ पोलीस कर्मचारी जखमी

Nashik News : चांदवड- लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती
Lasalgaon Accident
Nashik News Saam tv

अजय सोनवणे 

नाशिक : अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचत दारू वाहतूक करणारे वाहन दिसल्यानंतर पथकाने गाडी पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मात्र पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात होऊन सीमा शुल्क विभागाच्या वाहनवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

Lasalgaon Accident
Jalgaon Accident : मुलाला शाळेत सोडून घरी परतताना काळाचा घाला; दुचाकीने मागून धडक दिल्याने पित्याचा मृत्यू

चांदवड- लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या (Nashik) वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. दारू जप्त करण्याच्या अनुषंगाने सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पथकाने चांदवड- लासलगाव रस्त्यावर सापळा रचला होता. सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस (Police) यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनातुन पाठलाग सुरु केला.  

Lasalgaon Accident
Crop Insurance : रब्बी हंगामातही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झटका; जिल्ह्यात केवळ ४ कोटीचीच नुकसान भरपाई

गाडी अनियंत्रित होऊन झाली पलटी 

दरम्यान गाडीचा पाठलाग करत असताना सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणुल या ठिकाणी शेतात जाऊन (Accident) पलटी झाले. त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com