पुणे : कोल्हापूरच्या सारिका सुतार नावाच्या विधवा महिलेची किडनी काढून जवळपास 25 दिवस लोटून गेले. मात्र, अजुनही सारिका सुतार (Sarika Sutar) यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे माझी किडनी बेकायदेशीरपणे काढणार्यांना तातडीने अटक करा, म्हणून सारिका यांनी अक्षरशः कोरेगाव पार्क (Koregaon Park) पोलीस स्टेशनचा उंबरठा झिझवलाय. तरीही सारिका सुतार ह्या विधवा महीलेला अजुनही किडणी तस्करी प्रकरणात न्याय मिळालेला नाही. म्हणुन तिने आज स्वतः पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पायपीट केली आहे.
हे देखील पहा :
रवी भाऊ नावाच्या किडणी तस्कर दलालाच्या सांगण्यावरून सारिका सुतार या विधवा महिलेची किडनी (Kidney) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये 15 लाख रुपयासाठी बेकायदेशीरपणे काढण्यात आली. आज या घटनेला जवळपास पंचवीस दिवस लोटून गेले आहेत. मात्र, अजूनही सारिका सुतारला न्याय मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि पोलीस (Police) प्रशासन नेमकं काय करतंय? असा प्रश्न सारिका सुतार यांना पडला आहे. मी किडनी तस्कर रविभाऊ आणि रुबी हॉल क्लिनिक विरोधात तक्रार देऊनही, अजूनही साधा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असं सारिका यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर रवी भाऊला पोलिसांनी साध चौकशीसाठी देखील शोधलं नाही. त्यामुळे या किडणी तस्करी प्रकरणात पोलीस विभाग नेमकं कोणाला पाठीशी घालत आहे? असा प्रश्न सारिका सुतार यांनी उपस्थित केला आहे. सारिका सुतार किडनी तस्करी प्रकरणात पोलिसांनी तातडीने रविभाऊ या किडनी तस्कर दलाला अटक करावी आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सारिका सुतार हिची बहिण कवीता कोळी हिने केली आहे.
सारिका सुतार किडनी तस्करी प्रकरणाचे गांभीर्य पाहून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने (Health Department) या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली. मात्र, राज्य शासनाचा गृह विभाग असलेले पोलीस दल या प्रकरणात फक्त कागदी घोडे नाचवत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीडित महिला सारिका सुतार आणि त्याची तिच्या नातेवाईकांनी केली केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.