Beed : असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन द्या; मजूर पंचायतीचा मोर्चा

बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मिस्त्री कामबंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते.
Beed : असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन द्या; असंघटित मजूर पंचायतीचा मोर्चा
Beed : असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन द्या; असंघटित मजूर पंचायतीचा मोर्चाSaamTvNews
Published On

बीड : बांधकाम कामगार, हमाल, मापाडी यांच्यासह शेतकरी, शेतमजुर या असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रु. पेन्शन द्या यासह विविध मागण्यांसाठी बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो कष्टकरी सहभागी झाले होते. आज असंघटित मजूर पंचायतीच्या वतीने काढण्यात आलेला हा मोर्चा, बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून, सुभाष रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चा (Morcha) थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

हे देखील पहा :

यावेळी राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मिस्त्री कामबंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, बांधकाम कामगारांचे आणि हमाल मापाडी यांचे प्रश्न सुटेपर्यंत बेमूदत उपोषण (Hunger Strike) करणार असल्याचा इशारा हमाल मापाडी संघटनेचे नेते राजकुमार घायाळ यांनी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com