digital lounge Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway Station: लोकल सुटली, उशीर झाला... टेन्शन सोडा, रेल्वे स्टेशनवरच करा काम, रेल्वेचा मेगा प्लॅन

Digital Lounge At Western Railway Stations: मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे स्थानकांचा कायापालट करत असताना पश्चिम रेल्वेने डिजिटल लाऊंज ही संकल्पना अंमलामध्ये आणण्याचे ठरवले. याद्वारे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहे.

Priya More

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईतील रेल्वे स्थानकं आता हायटेक होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर लवकरच प्रवाशांना डिजिटल लाऊंजची सुविधा मिळणार आहे. या सुविधेमार्फत प्रवाशांना मोफत वीज, वायफाय आणि कॅफेची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. यामुळे जर तुम्हाला ऑफिसला जायला लेट झाला आणि तुमची लोकल सुटली असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याचे कारण नाही. कारण रेल्वे स्थानकांवरच तुम्हाला काम करता येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगा प्लॅन तयार केला आहे.

डिजिटल लाऊंज -

मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे स्थानकांचा कायापालट करत असताना पश्चिम रेल्वेने डिजिटल लाऊंज ही संकल्पना अंमलामध्ये आणण्याचे ठरवले. एअरपोर्टवर प्रवाशांच्या सोयीसाठी वेटिंग रुममध्ये अनेक अद्ययावत सुविधा असतात. तशाच प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगित तत्वावर प्रमुख रेल्वे स्थानकांवर डिजिटल लाऊंज उभारले जाणार आहे. या सोयी सुविधांचा रेल्वे प्रवाशांना चांगला फायदा होणार आहे.

प्रवाशांना मिळणार चांगल्या सोयी -

सध्या रेल्वे स्थानकांवर वेटिंग रुमची सोय आहे. याठिकाणी प्रवासी रेल्वेची प्रतीक्षा करू शकतात. पण याठिकाणी सोयी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठीच पश्चिम रेल्वे काही मोजक्या रेल्वे स्थानकावर डिजिटल लाऊंज उभारणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक तरुण जैन यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहेत.

इतक्या कोटींचा खर्च होणार -

पश्चिम रेल्वे स्थानके अद्ययावतीकरण प्रकल्पांतर्गत डिजिटल लाऊंजची उभारणी करणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ९४७ कोटी रुपयांची खर्च येण्याची शक्यता आहे. याद्वारे पश्चिम रेल्वेच्या एकूण १७ रेल्वे स्थानकाचा कालापालट होणार आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या ५ रेल्वे स्थानकांवर प्रामुख्यांनी डिजिटल लाऊंजची उभारणी केली जाणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या रेल्वे स्थानकातील जागांचा देखील आढावा घेतला आहे.

इतर नागरिकांनाही मिळणार लाभ -

महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ फक्त लोकल प्रवाशांच नाही तर इतर नागरिकांना देखील घेता येणार आहे. इतर नागरिकांना देखील या सोयी सुविधांचा वापर करता येणार आहे. यासाठी प्रत्येक तासांचे ठराविक भाडे आकारले जाणार आहे. डिजिटल लाऊंजमध्ये एकावेळी २० ते ५० व्यक्ती बसू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात अंतरवली सराटीमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

SCROLL FOR NEXT