वांद्रा ते अंधेरीदरम्यान स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार
आता १५ कोचची लोकल धावणार
प्रवाशांची गर्दी होणार कमी
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुसाट आणि सुखकर होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते वांद्रा येथील प्लॅटफॉर्मचा विस्तार जलद वेगाने होत आहे. यामुळे १५ कोचच्या ट्रेन सरु होणार आहेत. यामुळे आता पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना गर्दी मिळणार आहे. ट्रेनचे कोच वाढल्याने गर्दी आपोआप कमी होईल.
सध्या खार रोड स्टेशनवरील प्लॅटफॉर्मचे काम सुरु आहे. यानंतर वांद्रा, सांताक्रुझ, विलेपोर्ले स्टेशनचे काम होईल. यानंतर १५ डब्ब्यांची ट्रेन चालवणे सुरु होणार आहे. ही योजना मुंबई उपनगरीय रेल नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मचा विस्तार करताना सिग्नल पोल, ओएचई केबल आणि ट्रॅक लोकेशन हे बदल केले जाणार आहे. यानंतर अंधेरी ते वांद्रा येथे १५ कोचची ट्रेन सुरु करणे शक्य होणार आहे.
लाखो प्रवाशांना दिलासा (Andheri to Bandra 15 Coach Local)
प्लॅटफॉर्मची लांबी ही १२ ट्रेनच्या कोचसाठी मर्यादित असल्याने या स्थानकावर १५ कोच असलेल्या ट्रेन चालवणे शक्य नाही. मात्र,आता प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. काम पूर्ण झाल्यानंतर अंधेरी ते विरार स्लो कॉरिडोरला वांद्रापर्यंत वाढवण्यात येईल. यामुळे रोज ४-५ लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गर्दीदेखील होणार नाही.
या स्थानकांसाठी नवी योजना
प्लॅटफॉर्मचा विस्तार करणारे स्टेशन- विलेपार्ले, खार रोड, सांताक्रूझ, वांद्रा
१५ कोचची क्षमता-४,३८० प्रवासी
१२ कोचची क्षमता-३५०४ प्रवासी
एकूण १५ कोचच्या सेवा २११
स्लो कॉरिडोर सेवा-११२
रोजचे प्रवासी-७५००० ते १,००,०००
बीकेसी कनेक्टिव्हिटी मजबूत होणार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या १५ कोचच्या ट्रेनमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. पीक अवर्समध्ये गर्दी कमी होणार आहे. यामुळे दुर्घटनादेखील कमी होतील. यामुळे वांद्रा स्टेशनवर कमी गर्दी होईल. यामुळे वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससाठी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.