Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ

Amit Shah vs Mallikarjun Kharge: लोकसभेनंतर आज राज्यसभेत 'वंदे मातरम्'वर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ
Amit Shah vs Mallikarjun KhargeSaam Tv
Published On

Summary -

  • राज्यसभेत वंदे मातरम या मुद्द्यावर अमित शहा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली

  • अमित शहा यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले

  • नेहरूंनी वंदे मातरमचे दोन तुकडे केल्याचा आरोप अमित शहांनी केला

  • काँग्रेस नेते खरगे यांनी अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिले

संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी जोरदार चर्चा सुरू आहेत. सोमवारी लोकसभेत वंदे मातरम् वर जोरदार चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी चर्चेला सुरुवात केली आणि प्रियांका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाला पलटवार केला. आज राज्यसभेतही याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. राज्यसभेमध्ये अमित शहा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

अमित शहा यांनी पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर आरोप करत सांगितले की, 'जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे झाली तेव्हा नेहरूजींनी त्याचे दोन तुकडे केले. तुष्टीकरणासाठी वंदे मातरमला विरोध करण्यात आला. जेव्हा देश वंदे मातरमचा १०० वा वर्धापन दिन साजरा करत होता तेव्हा इंदिरा गांधी यांनी वंदे मारतमचा जयजयकार करणाऱ्यांना तुरूंगात टाकले होते. देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.'

तसंच, 'वंदे मारतमने आपल्या दैवी शक्तीला विसरलेल्या राष्ट्राला जागे केले. त्याने राष्ट्राच्या आत्म्याला जागृत केले. त्या काळात वंदे मारतम हे देशाच्या स्वातंत्र्याचे कारण होते आणि येणाऱ्या काळात ते देशाच्या विकासाचे आणि महानतेचे घोषवाक्य बनेल. वंदे मारतम ही भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्याची घोषणा होती. वंदे मातरम हे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती. वंदे मातरमने स्वातंत्र्य चळवळीला चालना दिली.', असे अमित शहा यांनी सांगितले.

अमित शाह यांनी काँग्रेस खासदारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'वंदे मातरम न म्हणण्याबद्दल विधाने करणाऱ्या आणि सभागृहातून बाहेर पडलेल्या सर्व काँग्रेस खासदारांची यादी मी आज संध्याकाळपर्यंत सभागृहाच्या टेबलावर ठेवेन. या सभागृहातील चर्चेचा रेकॉर्ड असा असावा की काँग्रेस खासदार वंदे मातरमला विरोध करतात. आमच्या सरकारने बंकिमचंद्रांच्या १३० व्या जयंतीनिमित्त एक टपाल तिकिट जारी केले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही 'प्रत्येक घरात तिरंगा' मोहीम देखील सुरू केली आणि तिरंगा फडकवताना वंदे मातरम म्हणायला विसरू नका असे आवाहन केले.'

Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ
Maharashtra Politics: परिवाराचा नाही तर..., बिहार निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं; मुंबईमध्ये बॅनर वाॅर|VIDEO

अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांच्या विधानांना प्रत्युत्तर दिले. आपले भाषण सुरू करण्यापूर्वी खरगे यांनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. ते म्हणाले, 'मी ६० वर्षांपासून हे गाणे गात आहे. जे वंदे मातरम गात नाहीत त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे. १८९६ मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा वंदे मातरम गायले होते. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसने 'वंदे मातरम' हा नारा बनवला. स्वातंत्र्य लढा आणि देशभक्तीपर गीतांना नेहमीच विरोध करण्याचा तुमचा इतिहास आहे. पूर्वी तुम्हाला देशभक्तीच्या नावाची भीती वाटत होती.', असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ
Maharashtra Politics: धुसफूस संपली! फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब

राज्यसभेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, '१९२१ मध्ये महात्मा गांधींनी सहकार चळवळ सुरू केली तेव्हा लाखो काँग्रेस स्वातंत्र्यसैनिक वंदे मातरमचा जयजयकार करत तुरुंगात गेले. त्यावेळी तुम्ही काय करत होता? तुम्ही ब्रिटिशांसाठी काम करत होता. पीएम मोदी नेहरूंचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि गृहमंत्री अमित शहाही तेच करत आहेत.'

मल्लिकार्जुन खरगे पुढे असेही म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी. ते स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा आणि तुरुंगात असलेल्या महापुरुषांचा अपमान करत आहेत. तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेही नाही. आम्ही स्वातंत्र्य आणले. तुम्ही संविधानाचा आदर करत नाही. तुम्ही आम्हाला विचारता की आम्ही काय केले. आम्हाला तुमच्या घरात काम करावे लागते का? आम्ही जे काही केले ते आम्ही देशासाठी केले.', असे म्हणत त्यांनी पीएम मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली.

Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ
Political News : "शत्रू भाऊ असला तरी..." कल्याणमध्ये बॅनर वादानंतर भाजप शिवसेनेमधील पॅनल वाद चव्हाट्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com