Maharashtra Politics: परिवाराचा नाही तर..., बिहार निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं; मुंबईमध्ये बॅनर वाॅर|VIDEO

Mumbai Local Elections Banner War BJP vs MNS: बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मुंबईत स्थानिक निवडणुकीपूर्वी राजकारण तापले आहे. दादर परिसरात भाजपकडून ‘परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक’ असा बॅनर लावण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीमध्ये भाजपप्राणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळल्यानंतर आता राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वीच राजकारण तापले आहे. काही दिवसांपूर्वी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लागले होते. मात्र ते नंतर राज ठाकरे यांच्या सुचनेनंतर काढण्यात आले. आता बिहार निकालानंतर पुन्हा एकदा दादर परिसरात पोस्टरबाजी दिसून आली. आता हे पोस्टर भाजपकडून लावण्यात आले आहे. या बॅनरवर परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा आशय लिहून भाजपने थेट मनसे आणि ठाकरे गटाला डिवचले आहे. या बॅनरमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गटातील वाद अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com