Maharashtra Rain Update Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast: वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 'या' भागात मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता; वाचा वेदर रिपोर्ट...

Weather Update Today: वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह, दिल्ली, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील एक-दोन दिवसांत मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता आहे.

Satish Daud

Maharashtra Rain News in Marathi

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. पर्वतीय भागात हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेकडून थंडगार वारे राज्याच्या दिशेनं कूच करीत आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय. येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)

काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा दाह वाढला आहे. रविवारी संध्याकाळनंतर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रीय असल्याने त्याचा थेट परिणाम मुंबईसह पुणे शहरातील वातावरणावर दिसत आहे. मंगळवारी (५ मार्च) मुंबईसह उपनगरातील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळं त्रासलेल्या मुंबईकरांना या अनपेक्षित थंडीमुळं काहीसा दिलासा मिळणार आहे.

देशातील हवामानाबाबत बोलायचं झाल्यास वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे राजधानी दिल्लीसह पूर्व मध्य प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील एक-दोन दिवसांत हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालयच्या काही भागातही पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे प्राधान्य

Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

SCROLL FOR NEXT