मेष
मेष राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींचा आज इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दिवस चांगला जाईल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना आज ऑफिसात कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील. दिवस भाग्याचा असेल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने कुटुंबात आनंद असेल.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींना आज प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना आज नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ झाल्याने हाती पैसा येईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे व्यक्ती आज आपल्या मतांविषयी आग्रही राहातील. तसेच दैनंदिन कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल झाल्याने आनंदी राहाल.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींनी आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवा.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींना आज कुटुंबासह मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्रव्यवहार पार पडतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळण्याची शक्यता.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने आनंदी राहाल.
मीन
मीन राशीच्या व्यक्तींना आज गुरूकृपा लाभेल. जीवनात एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.