Manoj Jarange News: मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

Manoj Jarange Patil News: मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.
Manoj Jarange Maratha Reservation Latest Update
Manoj Jarange Maratha Reservation Latest UpdateSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी साम टीव्ही नांदेड

Manoj Jarange Patil Maratha Andolan News

सगेसोयगरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात संवाद दौरा सुरू केला आहे. सोमवारी (ता.४) रात्री नांदेड येथे मराठा बांधवाना संबोधित करताना जरांगेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा दिला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Maratha Reservation Latest Update
Manoj Jarange News: माझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन येईल; SIT चौकशीवर मनोज जरांगेंचा टोला

कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली त्याचा कार्यक्रम करतोच मी...' असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर उत्तर देताना, मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात, असा इशारा  मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे.

"सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) झुलवत ठेवले सगेसोयऱ्यांचा शब्द देऊन अधिसूचना काढली, पण त्याचे कायद्यात रुपांतर केले नाही. विशेष अधिवेशनात मराठा नेत्यांनी यावर एकही शब्द काढला नाही. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं आहे, ते कोर्टात टिकणार नाही", असंही जरांगे म्हणाले. (Latest Marathi News)

"२०१८ साली मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यावेळेस जसं झालं, तसं आता देखील होईल.ओबीसीमधून आरक्षण मिळाले, तर केंद्र आणि राज्यात मराठा समाजाचे पोर नोकरीला लागतील", असं म्हणत जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांचे कान फुंकत असून त्यांना जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला लावत आहेत. पण कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तर माघारी हटू नका. तोंडाजवळ खास आला आहे, सोडू नका, असं आवाहन देखील जरांगेंनी मराठा बांधवांना केलं.

Manoj Jarange Maratha Reservation Latest Update
Raigad Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळ साधली; रायगड दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com