water level in mumbai lakes today Bhatsa and Upper Vaitarna Dam Latest Updates Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Lake Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत किती टक्के पाणीसाठा? पाहा आजची ताजी आकडेवारी

Mumbai Water Supply News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांतील पाललोट क्षेत्रातील पाणीसाठा समाधानकारक आहे.

Satish Daud

Mumbai Dam Water Level: गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पाण्याअभावी रिकामीच आहे. मात्र, प्रमुख शहरांमधील धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांतील पाललोट क्षेत्रातील पाणीसाठा समाधानकारक आहे. (Latest Marathi News)

या सातही धरणातील पाणीसाठी ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करण्याऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा देखील ८७ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आहे. तर अप्पर वैतरणा तलावात मात्र सर्वांत कमी पाणीसाठा जमा झाला झाले. या तलावात ७७ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.

दिलासादायक बाब म्हणजे शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणारे मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी हे चार तलाव सध्या भरले आहेत. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा तलाव अद्यापही भरणे बाकी आहे. हे तलाव भरण्यासाठी किमान दीड लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.

मुंबईत पुन्हा पाणीकपात लागू होणार?

शहराला पाणीपुरवठा (Mumbai Water) करणारे सर्व सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जवळपास १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. गेल्या १५ वर्षांत दोन वेळा तलाव ९० टक्केच भरल्याने वर्षभर १० टक्के पाणीकपात करावी लागली होती.

मात्र, यंदा पहिल्याच पावसात धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला. आता एका महिन्यात जर समाधानकारक पाणीसाठा जमा झाला, तर ही पाणीकपात रद्द राहिल, अन्यथा शहराला वर्षभर १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो, असं एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

तलावातील पिण्यायोग्य पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अपर वैतरणा : १,७४,९९९

मोडक सागर : १,२८,९१०

तानसा : १,४३,७१०

मध्य वैतरणा : १,८७,४५१

भातसा : ६,६६,३८

विहार : २७,६९८

तुळशी : ८,०४६

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT