Wardha Crime News: धक्कादायक! आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, वर्ध्यातील घटना

Wardha Crime News: वर्ध्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam Tv

चेतन व्यास

Wardha Crime News In Marathi

वर्ध्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातील आश्रमशाळेत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमशाळेतील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा गादीखाली मृतदेह आढळला. वर्धा जिल्ह्यातील यादवरावजी केचे आश्रमशाळेतील ही घटना आहे. ही आश्रमशाळा आर्वी विधानसभेचे भाजप आमदार दादाराव केचे यांची असल्याची माहिती हाती आहे.

Wardha Crime News
Kayan Crime News: गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबवला; तीन तासांनी दुसरी चोरी करताना चोरटा गजाआड

कारंजा घाडगे तालुक्यातील नारा या भागातील ही घटना आहे. या भागातील यादवरावजी केचे आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. भाजप आमदार दादाराव केचे यांच्या आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवम समोज उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटच्या चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील विद्यार्थी होता.

नेमकं काय घडलं?

आर्वी विधानसभेचे भाजपा आमदार दादाराव केचे यांच्या यादवरावजी केचे आश्रमशाळेत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू आढळला आहे. शिवम हा आश्रमशाळेत आज बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता दिसला होता. याच शिवमचा मृतदेह रात्री साडे आठ वाजता विद्यार्थी झोपण्याकरिता गादी काढताना गादीखाली आढळला. शिवमचा मृतदेह आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Wardha Crime News
Ahmednagar Crime News: नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण

घटनेची माहिती समजताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत घटनेची कसून चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे.

उद्या, गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन होणार आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com