Kayan Crime News: गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबवला; तीन तासांनी दुसरी चोरी करताना चोरटा गजाआड

kalyan Crime news: गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबईल चोरणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
mobile theft
mobile theft SaamTvNews
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News In Marathi

कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबईल चोरणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जहीर शेख व अजय आल्हाट असे दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

कल्याण रेल्वे स्थानकावर लोकल, मेल एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दोघे चोरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबईल लंपास करायचे. त्यामुळे प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याचा शोध सूरु केला होता.

mobile theft
Mumbai Crime News: तोतया पोलिसाकडून लाखोंची फसवणूक; सापळा रचत चोरट्यांचा पर्दाफाश

राज्य राणी एक्स्प्रेस मेलमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याचा तपास सुरू केला होता. त्यावेळी एक संशयित व्यक्ती फिरताना आढळला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला बेड्या ठोकल्या.

जहीर शेख असं या चोरट्याचं नाव आहे. जहीर हा मूळचा भुसावळ येथे राहणारा आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या अजय आल्हाट या सराईत चोरट्यालाही अटक केली आहे. या आधी देखील त्यांच्यावर रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

mobile theft
Ahmednagar Crime News: नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण

दागिने चोरून चोरटे पळाले अन्...

दरम्यान, काही दिवसापूर्वी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे वस्तू चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. दिनेश निनावे आणि संतोष चौधरी अशी चोरांची नावे आहेत. हे दोघेही चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.

कल्याण रेल्वे स्थानकात चोरी करणाऱ्या या दोघांनी कल्याण रेल्वे स्थानकावर मेल एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाची सोन्याचे दागिने चोरले होते. तसेच दागिने चोरून यांनी पळ काढला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com