Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर भयानक कृत्य केलं आहे. रामविलास (३८) या व्यक्तीने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रागाच्याभरात तिला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली आहे.
मयत महिलेचं नाव मिथिलेश असून तिचा प्रियकर लक्ष्मी शंकर हा तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्याचे प्राण वाचले. या भयावह घटनेनंतर पोलिसांनी रामविलास याला अटक केली आहे, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे
रामविलासला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं की, तो सोमवारी रात्री घरी परतला तेव्हा त्याला त्याची पत्नी मिथलेश एका पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. पोलिसांनी सांगितलं की, शेजाऱ्यांनी रामविलास यांच्या घरातून मदतीसाठी मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकला. तसेच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. एका गावकऱ्याने सांगितले की, मी रामविलास यांच्या घरी गेलो असता त्यांची पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तर रामविलासच्या हातात एक लांब वायर आणि वेल्डिंगचा रॉड होता. (Latest Marathi News)
पोलिसांनी सांगितलं की, रामविलासने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. यानंतर त्याने दोघांना दोन वेगवेगळ्या खोलीत बंद केलं. पत्नीला खोलीत बंद केल्यानंतर त्याने तिला विजेचा शॉक दिला. विजेच्या शॉकने ती बेशुद्ध पडली. मिथिलेश बेशुद्ध पडल्यावर रामविलासने तिला काठीने मारहाण केली. ज्यात तिचा मृत्यू झाला. याचं दरम्यान लक्ष्मी शंकर कसा तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी मंगळवारी आरोपी पतीला अटक केली आहे.
दरम्यान, रामविलास आणि मिथलेश यांना चार मुले असून त्यांचे वय चार ते आठ वर्षे आहे. रामविलास हा वेल्डरचं काम करतो. तो रोज रात्री उशिरापर्यंत आपले काम आणि उशिरा रात्री घरी यायचा, असे त्याने पोलिसांना सांगितले. याचा फायदा घेत त्याच्या पत्नीने लक्ष्मी शंकरसोबत अवैध प्रेमसंबंध ठेवले होते. त्याच्या अनुपस्थितीत दोघेही गुपचूप भेटत होते, असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.