Uddhav Thackeray Latest News: इंडिया आघाडीकडे PM पदासाठी अनेक पर्याय, पण NDA कडे मोदींशिवाय पर्यायच नाही: उद्धव ठाकरे

India Alliance Mumbai Press Conference: आज मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यात उद्धव ठाकरे यांनी एनडीएवर टीका केली आहे.
Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

Uddhav Thackeray On Pm Modi: आज मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी एनडीएवर टीका केली आहे. भाजप आणि एनडीएवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''एनडीएकडे पंतप्रधानपदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही.''

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमच्याकडे पंतप्रधानांच्या चेहऱ्यासाठी अनेक पर्याय आहेत, परंतु एनडीएकडे आणखी कोण आहेत?" ते म्हणाले, "कर्नाटकमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिले. त्यांना बजरंग बलीला आणावं लागलं. पण देवानेही त्यांना आशीर्वाद दिला नाही.''

Uddhav Thackeray Latest News
India Alliance News: इंडिया आघाडीची ताकद वाढली, आणखी दोन पक्ष झाले सहभागी

ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकाराच्या कायकाळाची तुलना ब्रिटिश राजवटीशी केली. ते म्हणाले, "इंग्रजांनीही विकासाची कामे केली, पण जर आपण त्यांना पूर्ण ताकदीने विरोध केला नसता तर आपल्याला आज स्वातंत्र्य मिळाले नसते. आम्हाला विकास हवा आहे, पण स्वातंत्र्यही हवे आहे." (Latest Marathi News)

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपथित होते. त्यांनीही पत्रकारानं मोदी यांना लक्ष्य करत म्हटलं आहे की, "मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की, त्यांनी उल्लेख केलेल्या सिंचन घोटाळ्याची सखोल चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे."

Uddhav Thackeray Latest News
Bacchu Kadu News: 'NDA बैठकीचं निमंत्रण मिळालं, मात्र मी जाणार नाही', बच्चू कडू यांनी सांगितलं कारण...

यातच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तटस्थ राहण्याच्या बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावतींच्या विधानाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, "मायावतींनी अजूनही भाजपशी त्यांचा संवाद कायम ठेवला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून त्याबाबत स्पष्टता येण्याची गरज आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com