vijay wadettiwar supports general motors employees, devendra fadnavis saam tv
मुंबई/पुणे

Talegoan : देवेंद्र फडणवीस, सुरेश खाडे दुतोंडी साप, जनरल मोटर्सच्या कामगारांचा सत्ताधा-यांना शाप लागेल : विजय वडेट्टीवार

General Motors Employees Andolan : तळेगाव एमआयडीसी उद्या (अकरा ऑक्टोबर) ठप्प करू असा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नुकताच सरकारला दिला आहे.

दिलीप कांबळे

Maval News : जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न राज्य सरकारने सोडवले नाहीत तर बेराेजगारीच्या छायेत लाटणा-या सत्ताधा-यांना कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा शाप लागेल असे विराेधीपक्ष नेते विजय वडेवट्टीवार यांनी म्हटले. तळेगावात साखळी उपोषणास बसलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी वडेवट्टीवर आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. (Maharashtra News)

विजय वडेट्टीवार म्हणाले तळेगाव एमआयडीसी ही विलासराव देशमुख यांनी सर्वांगीण विकासासाठी उभी केली. जनरल मोटरला टॅक्समध्ये सवलत देऊन महाराष्ट्रात उद्योगांना चालना मिळावी म्हणून फुकटात जमीन दिली. आता ती कंपनी बंद पडली आहे. यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत.

याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात विरोधीपक्ष नेते असताना मंत्री सुरेश खाडे यांना दिलं होते. त्यांनी पत्र पाहिले पाहिजे होत आणि कामगारांच्या भावना जाणून घ्यायला होत्या. तसं न करता कंपनीला क्लोजर मंजुरी दिली. सुरेश खाडे हे दुतोंडी सापासारखे आहेत असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

सुरेश खाडे यांनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. हा निर्णय का घेतला त्यांना कुणाचा फोन आला? की मलिदा मिळाला हे पाहावं लागेल असेही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले विधानसभेत हा प्रश्न आम्ही लावून धरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनरल मोटर बंद पडल्याने हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड आली आहे. असं असताना राज्यातील नेत्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे की एवढे कामगार उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचा शाप लागेल असेही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले.

दरम्यान मावळातील तळेगाव एमआयडीसी अकरा ऑक्टोबरला ठप्प करू. भले एमआयडीसी मधून कंपन्या स्थलांतरित झाल्या तरी आम्ही पर्वा करणार नाही असा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांनी नुकताच सरकारला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Winter Fashion: हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या टिप्स नक्की फॉलो करा, मिळेल ट्रेंडी आणि ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल

Olya Naralache Vade: जेवणाला पुऱ्याच कशाला? बनवा पांरपांरिक पद्धतीने कुरकुरीत ओल्या नारळाचे वडे

SCROLL FOR NEXT