Mumbai-Pune Expressway: गहूंजे ते लोणावळा सेवा रस्ता हाेणार?

गेली 15 ते 20 वर्षे बाधित शेतकरी ग्रामस्थ रस्त्यासाठी लढा देत आहेत.
maval news
maval newssaam tv
Published On

Maval News : पुणे- मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे लगत सेवा रस्ता (service road) व्हावा यासाठी लोणावळा ते उर्से गावातील बाधित शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला उपोषणाचा इशारा दिला होता. मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदाेलन हाेऊ नये यासाठी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि बाधित शेतकरी यांची सयूंक्त बैठक मावळ तहसील कार्यालयात बाेलावली. (Maharashtra News)

maval news
Jyotiba Dongar : जाेतिबाच्या नावानं चांगभलं... पाडळीतील मानाच्या सासनकाठीला केंद्राचे कॉपीराइट नामांकन

या बैठकीत गहूंजे ते लोणावळा येथील बाधित शेतकरी ज्यांच्या जमिनी एक्स्प्रेस हायवे उभारणीसाठी गेल्या त्या शेतकऱ्यांच्या मागण्यावरती विचार करण्यात यावा. तसेच पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्विस रोड होणेबाबत मागणीचा विचार करावा. उर्से गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठया प्रमाणावर एक्स्प्रेस वे दरम्यान आराखड्यात गेल्याने उर्से गावाच्या वेशीवर असलेल्या टोल नाक्याचे नाव तळेगांव काढून कायमस्वरूपी उर्से द्रुतगती टोल करण्यात यावा. या मागण्यासाठी गेली 15 ते 20 वर्षे बाधित शेतकरी ग्रामस्थ लढा देत आहेत असे स्पष्ट करण्यात आले.

maval news
Talegaon MIDC : ...अन्यथा तळेगाव एमआयडीसी बुधवारी बंद पाडणार : आमदार सुनील शेळके

पाहणी दाैरा हाेणार

मावळ तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन दहा तारखेच्या आत गहूंजे ते लोणावळा हा 30 ते 35 किलोमीटर दरम्यान सर्व्हिस रस्त्यांची पाहणी करणार असल्याचे नमूद केले.

अंतिम निर्णय शासन घेणार

त्यानंतर शासन दरबारी यावर अंतिम निर्णय ठरणार असं आश्वासन शेतकऱ्यांना तूर्तास जरी देण्यात आले. तरी जेव्हा प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल तेव्हाच बाधित शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडेल?' कारण सर्व्हिस रस्ता नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना एक्स्प्रेस वे वरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

अनेक शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. याची किमान किंचित तरी जबाबदारी उचलून आत्ता तरी रस्ते विकास महामंडळातील अधिकाऱ्यांचा डोळ्यांवर जी झापड आलीये ती उडेल का?' ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Edited By : Siddharth Latkar

maval news
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी' ला लाॅरी असाेसिएशनचे पाठबळ, कारखानदारांचा डाव माेडीत काढू, साखरेच्या पाेत्यांवर पाणी ओतणार; कार्यकर्ते आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com