Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी' ला लाॅरी असाेसिएशनचे पाठबळ, कारखानदारांचा डाव माेडीत काढू, साखरेच्या पाेत्यांवर पाणी ओतणार; कार्यकर्ते आक्रमक

साखर कारखानदारांनी हुशारी करु नये अन्यथा वाहनांसह साखरेचे नुकसान हाेईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana News, Kolhapur
Swabhimani Shetkari Sanghatana News, Kolhapur saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : साखर कारखानदारांनी साखरेची वाहतुक थांबवावी अन्यथा गाड्या अडवून साखरेच्या पाेत्यावर पाणी ओतणार असा इशारा स्वाभिमानीने कारखानदारांना दिला आहे. ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये न दिल्याने गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदाेलन छेडत आहेत. (Maharashtra News)

Swabhimani Shetkari Sanghatana News, Kolhapur
Kolhapur Politics : भाजप नेत्याने काेल्हापूरच्या पालकमंत्र्यांना भरला दम (पाहा व्हिडिओ)

गुरुवारी शरद सहकारी साखर कारखाना नरंदे या कारखान्याने पुन्हा साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याबाहेर ट्रक अडवून ट्रकची हवा सोडली. तर उर्वरीत चार गा्डया कारखाना कार्यस्थळावर दाखल झाल्या.

Swabhimani Shetkari Sanghatana News, Kolhapur
Nitesh Rane News : पत्रकारांचे कोण पाेट भरत असेल, चहाची तहान भागवत असेल तर त्यात वाईट काय? नितेश राणे

कोल्हापूर जिल्हा लॅारी असोसिएशनने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. व्यापारी व कारखानदार शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी दुप्पट ट्रक भाडे देऊन साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला. त्यांचा हा प्रयत्न सफल हाेणार नाही असेही स्वाभिमानीने स्पष्ट केले.

दरम्यान एखादी गाडी साखर कारखान्यातून बाहेर पडली तर त्या गाडीतील साखरेच्या पोत्यावर पाणी ओतून साखर भिजवून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखानादारांनी मागणी पूर्ण केल्याशिवाय साखर वाहतुक थांबवावी असे आवाहन स्वाभिमानीने कारखानदारांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Swabhimani Shetkari Sanghatana News, Kolhapur
Pitru Paksha 2023 : एपीएमसीत भाज्यांचे दर कडाडले! वाटाणा 150 रुपयांवर, मेथीने गाठली पन्नाशी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com