Vegetables price in maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Vegetables Price: पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले, वाटाणा १५० पार, शेवगाही महागला; जाणून घ्या APMC मार्केटमधील आजचा भाव

Vegetables rate in Maharashtra: पावसाने गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. परंतु फळभाज्यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात पावसाने नुकतीच हजेरी लावली आहे.राज्यात पावसाने जोर धरला आहे. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढली असली तरीही भाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.मागील काही दिवस पुरेसा पाऊस न पडल्याने भाज्यांचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी आवक घटली अन् भाज्यांचे दर वाढले. परंतु आता बाजारात आवक वाढली असली तरीही भाज्यांचे दर वाढले आहेत. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये फळभाज्यांचे दर वाढले आहेत. तर पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.

बाजारात सध्या फरसबी १०० रुपये प्रति किलो विकली जात आहे. घेवडा ५५ रुपये तर काकडी २६ रुपये किलो विकली जात आहे. शेवग्याच्या शेंगा ८५ रुपये, वाटाणा १७० रुपये तर फ्लॉवर २८ रुपयेांवर विकला जात आहे. गाजर २६ रुपये,ढोबळी मिरची ४० तर भेंडी ५० रुपयांवर विकली जात आहे. चवळीची शेंग ४० रुपये आणि सुरण ६० रुपयांना विकले जात आहे.

पालेभाज्यांच्या किंमती

पावसाने हजेरी लावल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हिरव्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहे. पालेभाज्यांच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर १५ रुपये, मेथी १२ तर पालक १२ रुपये प्रति जुडी विकली जात आहे. कांद्याची पात १६ रुपये तर मुळा ६० रुपयांना विकला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

SCROLL FOR NEXT