Sakshi Sunil Jadhav
घरात किंवा रस्त्यात वारंवार मोराचं पीस सापडत असेल तर अनेकांना हा शुभ संकेत वाटतो. काहीजण याला आध्यात्मिक चिन्ह मानतात, तर विज्ञान यामागे वेगळं कारण सांगतं.
हिंदू परंपरेनुसार मोरपिस श्रीकृष्णाशी जोडलेले आहे. त्यामुळे ते सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते.
घरात मोरपिस ठेवल्याने वाईट शक्ती लांब राहते, असा लोकविश्वास आहे. त्यामुळे अनेकजण ते पूजेच्या ठिकाणी ठेवतात.
काही मतांनुसार वारंवार मोरपिस दिसणं म्हणजे घरात धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा विश्वास वास्तुशास्त्राशीही जोडला जातो.
मोर आत्मविश्वास आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हे पिस सापडणं प्रगतीचा संकेत मानला जातो.
स्वप्नात मोराचे पिस दिसल्यास नवीन संधी येण्याचा संकेत समजला जातो. काहीजण याला शुभ संदेश मानतात.
मोर नैसर्गिकरित्या आपली पिसे गळवतात. त्यामुळे पिस सापडणे हा पूर्णपणे नैसर्गिक प्रकार आहे.
ज्या भागात मोर जास्त असतात तिथे पिसे सापडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हा योगायोगही असू शकतो.
वास्तुनुसार मोरपिस घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्यावर घरात सकारात्मक परिणाम होतात, असा समज आहे.
मोरपिस सापडणे शुभ की अशुभ हे व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. विज्ञान याला नैसर्गिक घटना मानते.