Manasvi Choudhary
मुलींच्या पायात काळा धागा बांधण्याची पद्धत सध्या ट्रेंडच झाली आहे. काही जण हा धागा फॅशन म्हणून बांधतात तर काही शास्त्रीय कारण म्हणून बांधतात.
हिंदू धर्मात अनेक प्रथा पद्धती पाळल्या जातात अनेकदा धागा बांधण्याची प्रथा म्हणून मुलींच्या पायात काळा धागा बांधला जातो.
लहान मुलींना कोणाचीही नजर लागू नये म्हणून पायात काळा धागा बांधतात. काळा रंग हा नकारात्मक उर्जा शोषून घेतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग हा शनी ग्रहाशी संबंधित आहे. पायात काळा धागा बांधल्याने शनी ग्रहाचा प्रभाव शुभ होतो
पायाच्या अंगठ्यात किंवा घोट्याला काळा धागा बांधल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारते असं मानले जाते.
काळा धागा बांधल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि कामात यश मिळते असं देखील मानतात.
आजकाल मुली वेस्टर्न कपड्यांवर स्टाईल म्हणून डिझाईनचे ब्लॅक अॅकलेट्स घालतात. हा देखील ट्रेंडच आहे.
शास्त्रानुसार मुलींनी काळा धागा डाव्या पायात बांधावा
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिकर माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.