Silver Jewellery Cleaning Tips: चांदीचे दागिने घरी कसे साफ करायचे?

Manasvi Choudhary

चांदीचे दागिने

चांदीचे दागिने सतत वापरून काळे पडतात. सणासुदीला, कार्यक्रमाला चांदीच्या दागिन्यांवर चकाकी आणायची असल्यास तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

Silver Jewellery Cleaning

घरगुती उपाय

चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय काय कराल? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Silver Jewellery Cleaning

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करून तुम्ही टूथब्रशने चांदीवर घासा यामुळे काळपटपणा निघून जातो.

Silver Jewellery Cleaning

टूथपेस्ट

टूथपेस्ट ब्रशला लावून चांदीच्या दागिन्यावर घासा त्यांनतर पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या.

Silver Jewellery Cleaning

ॲल्युमिनियम फॉइल आणि मीठ

जर तुमचे दागिने खूप जास्त काळे झाले असतील  तर गरम पाण्यात ॲल्युमिनियम फॉइलचे काही तुकडे आणि मीठ टाका नंतर यामध्ये चांदीचे दागिने टाका. रासायनिक प्रक्रियेमुळे दागिन्यांवरील काळेपणा निघून फॉइलवर जमा होईल.

Silver Jewellery Cleaning

टोमॅटो केचप

टोमॅटो केचपने दागिन्यांने घासल्याने चांदी चकाकते. टोमॅटो केचप चांदीवर लावा नंतर पाण्याने धुवून कापडाने स्वच्छ पुसून घ्या.  केचपमधील ॲसिड चांदी साफ करते.

Silver Jewellery Cleaning

दागिने कधीच ओले ठेवू नका

दागिने धुतल्यानंतर ते मऊ सुती कापडाने पूर्णपणे कोरडे करा. जर ओलावा राहिला, तर ते पुन्हा काळे पडतील.

Silver Jewellery Cleaning

next: 2 Vati Mangalsutra Designs: सौभाग्याचं लेणं असणाऱ्या दोन वाटी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, महिलांचा लूक दिसेल भारी

येथे क्लिक करा...