Manasvi Choudhary
वाटी मंगळसूत्र ही फार जुनी फॅशन आहे. पूर्वीपासून महिला २ वाटी पेडंट असलेलं मंगळसूत्र घालतात.
आता बाजारात अनेक नवनवीन पॅटर्नमधील २ वाटी मंगळसूत्र आहेत. ते तुम्ही देखील ट्राय करू शकता.
मंगळसूत्रातील दोन वाट्या म्हणजे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक आहे. आजकाल यामध्ये देखील बरेच डिझाईन्स उपलब्ध आहेत. तुम्ही सोन्यामध्ये देखील ते बनवू शकता.
कोरीव नक्षीकाम मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्राच्या वाटी पेडंटवर कोरीव काम केलेले असते हे मंगळसूत्र पूर्णपणे प्लेन नसून त्यावर नाजूक फुलांची डिझाईन असते.
मीनाकारी दोन वाटी मंगळसूत्रामध्ये रंगीबेरंगी लाल, हिरवा किंवा निळा रंगामध्ये वाट्यांचे कोरीवर काम केलेले असते किंवा या रंगाचे हिरे देखील असतात.
आजकाल वाट्यांमध्ये खडे बसवण्याचा मोठा ट्रेंड आहे. वाट्यांच्या मधोमध किंवा कडेने बारीक पांढरे खडे किंवा हिरे डिझाईन केलेला असतात. लग्नसंमारंभात तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता.
टेम्पल ज्वेलरी स्टाईलमध्ये वाट्यांवर देवी लक्ष्मी किंवा मोराची डिझाईन केलेली असते. हे दक्षिण भारतीय महिलांमध्ये प्रसिद्ध पॅटर्न आहे.
ज्यांना सोन्याचा खूप जास्त पिवळा चकचकीपणा आवडत नाही, त्यांच्यासाठी 'मॅट फिनिश' वाटी मंगळसूत्र डिझाईन्स आहेत.