Vaishnavi Hagawane News : हुंड्यासाठी छळ करुन वैष्णवी हगवणेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असतानाच या प्रकरणाला नवं वळण मिळालंय... पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पाठबळामुळेच हगवणे कुटुंब सुनांची छळछावणी चालवत असल्याचा आरोप दमानियांनी केलाय... एवढंच नाही तर हगवणेची मोठी सून मयुरी जगतापने नोव्हेंबर 2024 मध्ये दिलेल्या तक्रारीची दखलही सुपेकरांच्या दबावामुळेच घेतली नसल्याचा आरोप दमानियांनी केलाय...
हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल 24 तासांनी पोलीसांनी तक्रार घेतली... मात्र पोलीस कुणाच्या दबावामुळे एफआयआर दाखल करत नव्हते, असा सवाल उपस्थित केला जातोय... एवढंच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी सुपेकरांनीच मदत केल्याची शंका दमानियांनी व्यक्त केली होती.... आता तर दमानियांनी ऑडिओ क्लीप ऐकवत सुपेकरांवर नवा आरोप केलाय.... तर यानंतर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावलेत....
जालिंदर सुपेकरांचा खुलासा
- गेल्या २ वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात
- पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा पदावर
- कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही
- मी कोणाला सूचना देण्याचा संबंध नाही
- हगवणे कुटुंबाबाबत कोणालाही सूचना दिली नाही
- हगवणेंच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये
- ऑडिओ क्लीप बनवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार
वैष्णवीच्या हुंडाबळीमुळे संपूर्ण राज्य हादरुन गेलंय... तिला न्याय देण्याची मागणी केली जातेय.. मात्र पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरही आरोप करण्यात येत असल्याने सरकार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलंय... एवढंच नाही तर हगवणेंसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.