Jalna News : लिकेजमुळे गॅसचा स्फोट अन् होत्याचं नव्हतं झालं, १००-५००च्या नोटा जळाल्या, पाळीव कुत्र्याचा जागीच मृत्यू

Gas explosion : जालना शहरात गॅस लिकेजमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातल्या पाळीव कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. १०० आणि ५०० च्या नोटा जळल्या, तसेच घरातील तिघे जखमी झाले.
Jalna News
Jalna NewsSaam Tv
Published On

अक्षय शिंदे-पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

जालना शहरात घरगुती स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यामधील कालीकुर्ती परिसरातील तरलेचा नगर येथे ही घटना घडली आहे. गॅस लिकेज झाल्यामुळे गॅसचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कुटुंबातील तिघेजण जखमी झाले आहेत, तसेच घरातील पाळीव कुत्र्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या बडीसडक परिसरातील कालीकुर्ती भागातील तरलेच्या नगरमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील अनेक गृहउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. तसेच कुटुंबातील तीन जण गंभीररित्या जखमी झाले.

Jalna News
Crime : लग्नाच्या मंडपात खेळत होती ३ वर्षांची चिमुरडी, मिठाईचं आमिष दाखवत पळवलं, अत्याचार केल्यानंतर संपवलं

घरगुती स्फोटामध्ये जखमी झालेल्या कुटुंबियांवर जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. या स्फोटामध्ये घरातील ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा देखील जळाल्या आहेत. स्फोटामध्ये गृहउपयोगी वस्तू आणि पैसे जळाल्याने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

Jalna News
Crime News : घरी कुणी नसताना आत शिरला, २२ वर्षीय तरुणीचा गळा चिरला; साखरपुडा मोडणं पडलं महागात

जालना शहरात एका घरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातील पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. अनेक वस्तू जळाल्या, त्यासह ५०० आणि १००० रुपयांच्या अनेक नोट्या जळाल्या. तसेच कुटुंबातील तिघांना स्फोटामुळे गंभीर जखमा झाल्या. जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Jalna News
पैश्यांच्या बदल्यात मुलाला तारण ठेवलं, पण पैसे परत करायला गेलेल्या आईला जमिनीत पुरलेलं शव मिळालं, घटना वाचून डोळ्यात येईल पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com