तुला माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल अन्...; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, गौप्यस्फोटाने सिनेक्षेत्रात खळबळ

Casting Couch Experience : मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे.
Casting Couch Experience
Casting Couch ExperienceX
Published On

मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या कान्स लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स लूकमुळे ती सध्या चर्चेत आहे. 'मे आय कम इन मॅडम?' या मालिकेमुळे नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश केला जातो. पण जेव्हा नेहाने सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिला स्ट्रगल करावा लागला होता. मुलाखतीत, तिने कास्टिंग काऊच अनुभवावर भाष्य केले.

नेहा पेंडसेने मनोरंजन सृष्टीतील कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, एका अभिनेत्याने तिला त्रास दिला होता. माझ्यासोबत एक रात्र घालव असे अभिनेत्याने तिला म्हटले होते. याला नेहाने स्पष्ट नकार दिला होता. या घटनेनंतर तिला खूप त्रास झाला होता, तिला वाईट वाटले होते. एका वाईट अनुभवाने खचून न जाता तिने याच क्षेत्रात काम करत राहण्याचा निर्णय घेतला.

Casting Couch Experience
Alia Bhatt : आलिया भट्टच्या कान्स लूकमुळे 'लव्ह अँड वॉर'ची क्रेझ वाढली, चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

मी माझ्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे, जी मनोरंजन सृष्टीमध्ये कार्यरत आहे. या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला सुरुवातीला नातेवाईकांनी खूप टोमणे मारले होते. पण जेव्हा तिला प्रसिद्धी मिळाली, तेव्हा तेच नातेवाईक माझ्याबद्दल सर्वांना सांगत होते, असे देखील नेहाने कार्यक्रमाच्या प्रमोशनदरम्यान म्हटले होते.

Casting Couch Experience
Bhool chuk maaf Vs Veer Kesari: 'भूल चुक माफ' की 'केसरी वीर'कोणी मारली बाजी? कोणी जमावला जास्त गल्ला?

कॅप्टन हाऊस या टीव्ही शोच्या माध्यमातून नेहा पेंडसेने कारकिर्दीची सुरुवात केली. पडोसन आणि हसरते या मालिकांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. मे आय कम इन ही तिची मालिका खूप गाजली. तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाग: द फायर या हिंदी चित्रपटात ती झळकली आहे. त्यानंतर तिने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांत देखील काम केले आहे.

Casting Couch Experience
The Great Indian Kapil Show: अतरंगी गँगसोबत परतणार कपिल शर्मा; या दिवसापासून सुरु होणार द ग्रेट इंडियन कपिल शो' तिसरा सीझन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com