Bhool chuk maaf Vs Veer Kesari: 'भूल चुक माफ' की 'केसरी वीर'कोणी मारली बाजी? कोणी जमावला जास्त गल्ला?

Bhool chuk maaf Vs Veer Kesari Box Office Collection: राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल चुक माफ' या चित्रपटाने २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
Bhool chuk maaf Vs Veer Kesari
Bhool chuk maaf Vs Veer KesariSaam Tv
Published On

Box Office Collection: राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल चुक माफ' या चित्रपटाने २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे ७.२० कोटींची कमाई केली आहे, जी राजकुमार रावच्या कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम ओपनिंग आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी थिएटर आणि ओटीटी रिलीजबाबत काही वाद निर्माण झाले होते, परंतु तरीही प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटाची संकल्पना 'टाइम लूप'वर आधारित असून, त्यात विनोदी आणि नाट्यमय घटकांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटात १९.३६% लोकांची उपस्थिती नोंदवली गेली.

Bhool chuk maaf Vs Veer Kesari
Jarann: काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ उलगडणार लवकरच; 'जारण'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

दुसरीकडे, त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' या ऐतिहासिक चित्रपटाने केवळ २५ लाखांची कमाई केली, जी २०२५ मधील सर्वात कमी ओपनिंगपैकी एक आहे. सुनिल शेट्टी, सूरज पांचोली आणि विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

Bhool chuk maaf Vs Veer Kesari
Bollywood Actor Passes Away:प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'भूल चुक माफ' च्या यशामुळे राजकुमार रावच्या कारकिर्दीला नवीन उंची मिळाली आहे. दुसरीकडे, 'केसरी वीर' च्या कमकुवत ओपनिंगमुळे चित्रपटाच्या भविष्यातील कमाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com