Alia Bhatt : आलिया भट्टच्या कान्स लूकमुळे 'लव्ह अँड वॉर'ची क्रेझ वाढली, चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

Love And War : आलिया भट्टच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची क्रेझ वाढताना दिसत आहे. तिच्या कान्स लूकनं तर चाहत्यांना भुरळ घातली आहे.
Love And War
Alia BhattSAAM TV
Published On

प्रेक्षकांना आपल्या कथेने वेड लावणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा आपला आगामी प्रोजेक्ट 'लव्ह अँड वॉर' द्वारे (Love And War) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात केवळ प्रचंड भव्यता आणि भावनिक खोली असणार नाही तर बॉलिवूडचे तीन दमदार कलाकार विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रथमच एकत्र झळकणार आहेत.संजय लीला भन्साळी प्रत्येक चित्रपटात झळकणाऱ्या अभिनेत्रीला एक खास ओळख मिळते. तिला 'भन्साळी हीरोइन' असं संबोधलं जातं.

संजय लीला भन्साळीच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य केवळ त्यांची भव्य मांडणी नव्हे तर त्यामधील स्त्री पात्रांची ताकदवान आणि गूढ सादरीकरण देखील असते. स्त्री पात्र ते देखण्या, भावपूर्ण आणि प्रभावशाली स्वरूपात उभी करतात. त्यांच्या चित्रपटांतील स्त्री पात्रं प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळासाठी घर करतात. अलीकडेच, 'लव्ह अँड वॉर'ची मुख्य अभिनेत्री आलिया भट्टने 'कान्स 2025' च्या रेड कार्पेटवर तिच्या मोहक आणि रॉयल अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांमकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आलियाचा साधेपणाने नटलेला पण राजेशाही लूक पाहून सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिचे खूप कौतुक होत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

  • "आत्तापासूनच तिला 'लव्ह अँड वॉर'मध्ये पाहतोय, ओ माय गॉड!"

  • "इतकी सुंदर दिसतेय...

  • "लांब गाउनमध्ये तिचं सौंदर्यच वेगळं भासतंय, 'लव्ह अँड वॉर' लुक पाहायला हवा आता!"

  • "आलिया मॅडम, आम्हा सर्वांना तुम्हाला 'लव्ह अँड वॉर'मध्ये पाहायचंय, फारच उत्सुकता आहे!"

  • "चेहरा, अभिनय, ती भन्साळी हीरोइनची तयारी –सगळं रिअल वाटतंय!"

  • "कान्सची क्वीन आणि आता 'लव्ह अँड वॉर'ची देखील!"

  • "2025 कान्स, 2025 'लव्ह अँड वॉर'- केवळ क्वीन एनर्जीच दिसतेय!"

  • "आलिया 'लव्ह अँड वॉर'मध्ये किती सुंदर दिसेल याची कल्पनाच सुंदर आहे!"

आलियाचा हा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'साठीची उत्सुकता आणखी वाढली आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशलला एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Love And War
Genelia : कारमध्ये बसताना जिनिलीया पडता पडता वाचली, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com