Shruti Kadam
आलिया भट्टने 78व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या पदार्पण केलं आहे.
आलियाने शिआपरेलीच्या स्प्रिंग 2025 कुट्यूर कलेक्शनमधील पीच रंगाच्या ऑफ-शोल्डर बॉडीकॉन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर प्रवेश केला.
आलियाने क्लासिक पर्ल स्टड्स आणि बनसह आपला लूक पूर्ण केला, ज्यामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अजून चारचांद लागले.
आलिया भट्टने 'द मास्टरमाइंड' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहून आपल्या कान्सच्या प्रवासाची सुरुवात केली.
ब्रिटिश अभिनेत्री सिमोन अॅशलीसोबत आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे दोघींच्या सौंदर्याचं कौतुक करण्यात आलं.
आलिया भट्ट ल'ऑरियल पॅरिसच्या जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली.
आलियाच्या उपस्थितीने भारतीय चित्रपटसृष्टीचं जागतिक मंचावर प्रभावीपणे प्रतिनिधित्व केलं.