बॉलिवूडचे पावर कपल रितेश देशमुख आणि जिनिलीया कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ही दोघ आपल्या मुलांसोबत अनेक वेळा स्पॉट होतात. रितेश देशमुख सध्या त्याचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर जिनिलीया चा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात आता सोशल मीडियावर जिनिलीयाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायर होणाऱ्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पडता पडता वाचली आहे, असे दिसत आहे.
जिनिलीयाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती कारमध्ये बसत असताना अचानक ड्रायव्हर गाडी चालू करतो आणि जिनिलीयाचा तोल जातो. अभिनेत्री पडता पडता वाचते. ड्रायव्हर नकळतपणे गाडी चालवायला जातो. मात्र या घटनेत जिनिलीया न पडता स्वतःला सावरते आणि मग ड्रायव्हर देखील गाडी थांबवतो. शेवटी अभिनेत्री गाडीमध्ये नीट बसते. व्हिडीओत कारमध्ये जिनिलीया -रितेशची मुलं रियान आणि राहिल देखील पाहायला मिळत आहेत. गाडी सुरू असताना कारचा दरवाजा उघडाच होता.
जिनिलीयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक तिच्या संयमाचे कौतुक करत आहेत. तर काही तिच्यासाठी काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. जिनिलीया आपल्या मुलांच्या मागोमाग कारमध्ये बसायला जात असताना ही घटना घडली. जिनिलीया या घटनेनंतर ड्रायव्हरवर न रागवता तेथून निघून गेली.
'सितारे जमीन पर' चित्रपटात जिनिलीयासोबत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खान देखील झळकणार आहे. 'सितारे ज़मीन पर' 20 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. 'तारे जमीन पर' या 2007 मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल 'सितारे जमीन पर' आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.