IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

India vs England Live Score, 2nd Test Day 3: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे होतोय. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघाने नांगी टाकली.
IND vs ENG Test 2 Day
India vs England Live Score, 2nd Test Day 3saam tv
Published On

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा दुसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर संपला. भारतीय गोलंदाज सिराजने ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. सिराजप्रमाणे आकाशदीपने ४ विकेट्स घेतल्या. या दोन्ही गोलंदाजाच्या धमाकेदार गोलंदाजीमुळे भारताकडे १८० धावांची आघाडी आलीय. त्यानंतर टीम इंडिया पुढील डाव खेळण्यासाठी मैदानात उतरली. यशस्वी जयस्वालची विकेट गमावल्यानंतर दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात ६४ धावा केल्या होत्या. म्हणजेच भारताची आघाडी आता २४४ धावांपर्यंत झालीय.

मोहम्मद सिराजने तिसऱ्या दिवसाची सुरुवात धमाकेदार गोलंदाजीने केली. त्याच्या पहिल्याच षटकात त्याने जो रूट आणि कर्णधार स्टोक्सला बाद केले. पण सिराज हॅटट्रिक घेऊ शकला नाही. पण यानंतर स्मिथ आणि ब्रूकने शानदार फलंदाजी केली. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला संघाचं खेळात वर्चस्व होऊ दिलं नाही. शुबमन गिलच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या होत्या.

पहिल्या डावात इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. त्यांना १३ धावांवर सलग दोन धक्के बसले. आकाश दीपने गेल्या सामन्यातील शतकवीर बेन डकेट आणि ऑली पोप यांना ० धावांवर बाद केले. जॅक क्रॉली देखील काही खास फलंदाजी करू शकला नाही. तो १९ धावांवर सिराजचा बळी ठरला.

IND vs ENG Test 2 Day
Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

सिराजने तिसऱ्या दिवसाची सुरुवात धमाकेदार केली. त्याच्या पहिल्याच षटकात त्याने जो रूट आणि बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टोक्सला त्याचे खातेही उघडता आले नाही आणि तो गोल्डन डक झाला. त्याचवेळी रूटच्या बॅटमधून २२ धावा आल्या. यानंतर ब्रूक आणि स्मिथमध्ये ३०३ धावांची भागीदारी झाली. पण इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर मर्यादित राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com