वैष्णवी हगवणे प्रकरणाला वळण लागलं आहे. हगवणे कुटुंबाने केलेल्या आरोपाने या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी करत होती. तिला आम्ही पकडलं, असा गंभीर आरोप केला आहे. तिने याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, हगवणे कुटुंबाने केलेल्या या गंभीर आरोपाने वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दोशी यांनी ही माहिती दिली.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या बाजूने वकील विपुल दोशी यांनी युक्तीवाद केला. यावेळी वैष्णवीचं न्यायालयात चारित्र्यहणण करण्याचा हगवणेंच्या वकीलांनी प्रयत्न केला. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्हाला चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करु, असा हगवणे कुटुंबाचं म्हणणं आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात झाली. कोर्टात सुनावणीदरम्यान वकील विपुल दोशी यांनी हगवणे कुटुंबाची बाजू मांडली. त्यांनी कोर्टातील युक्तिवादानंतर माध्यमांशी संवाद साधला.
विपुल दोशी म्हणाले, 'पोलीस कोठडी देण्याची काही गरज नाही. गहाण ठेवलेले सोनं कुठल्या बँकेत आहे, हे हगवणे यांनी आधीच सांगितलं आहे. निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचं आहे, त्याचा काही संबंध नाही. तो हगवणे यांचा नातेवाईक नाही. निलेश चव्हाण याने बाळाला सांभाळलं, पण हेळसांड केली म्हणून त्यावर गुन्हा दाखल केला. तो चुकीचा असेल तर त्याला फाशी द्या. मीडिया ट्रायल सुरू केलेली आहे'.
'जगात मोबाईलचे चॅट पोहचले आहेत आणि कुठले चॅट लपवले असे म्हणतात. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती. ते आम्ही पकडलं. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. एक नवरा म्हणून त्याने काय केलं पाहिजे, आम्हाला न्याय आहे. वैष्णवीची आत्महत्येची प्रवृत्ती होती. तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.
'आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळं आहे, पण ते शोधायचं आम्हाला नाही. ४० लाख रुपयांची गाडी दिली म्हणतात. त्यांच्या घरात ५ कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी, असे त्यांनी पुढे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.