Vaishnavi Hagawane Case: अश्लील व्हिडिओ दाखवत जबरदस्ती, सासूची काळी जादू; राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंदेचा प्रताप उघड

Vaishnavi Hagawane Death Case: राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी सुयश चोंदे याने कार दिली होती. आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या चौंदेचा प्रताप समोर आलाय.
Suyash Chonde
Vaishnavi Hagawane Death Casesaam tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचा समावेश आहे. याचदरम्यान या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय.

वैष्णवी प्रकरणात नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपींची मदत करणारे सुद्धा कोणत्या कोणत्या प्रकरणात आरोपी असल्याचं समोर येत आहे. पुणे पोलीस वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पोलीसस या प्रकरणाची सर्व पाळेमुळे उकरून काढत आहे. वैष्णवीच्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांची कुंडली पोलीस बाहेर काढत आहे. याच दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सुयश चौंधेचा प्रताप समोर आलाय.

चोंदेविरोधात देखील पत्नीला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. चोंदेही पत्नीला मारहाण केल्याप्रकरणात आरोपी असून त्याच्याविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयश चोंदे याने आपल्या पत्नीला मारहाण केली असून याप्रकरणी त्याची पत्नी धनश्री सुयश चौंदे ह्यानी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. बायकोचा छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलीय.

Suyash Chonde
Vaishnavi Hagawane Death Case: राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या ५ जणांना न्यायालयीन कोठडी, माजी मंत्र्याच्या मुलाचीही तुरुंगात रवानगी

दरम्यान वैष्णवी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे ,सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी सुयश चोंदे, संतोष चोंदे यांनी थार कार दिली होती. सुयश चोंदे आणि संतोष चोंदे हे त्यांच्या क्रेटा कारला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरत होते. लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही ते कारचा गैरवापर करत. मुळशीमध्ये थार गाड्या घेऊन पोलिसांसमोर माज करणे व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.

सुयश चोंदे याने अश्लील व्हिडिओ दाखवत पत्नी धनश्री सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने व्हिडिओप्रमाणे शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. इतकेच नाहीत धनश्री ह्यांचा सुयशच्या आईकडून छळ केला जात होता. धनश्रीच्या सासूनं तिच्यावर काळी जादू केली होती.

सासूची काळी जादू

धनश्री ह्यांच्यावर तिच्या सासूने काळी जादू केली होती. वैशाली चोंदे असं तिच्या सासूचं नाव आहे. सासू धनश्रीवर काळी जादू करत असायची. नवरा बायको वेगळे व्हावेत म्हणून सासूकडून काळ्या जादूचे प्रयोग केले जाते होते. याबाबत धनश्रीनं धनश्री बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. त्याचबरोबर धनश्री ह्यांच्यावर सासू आणि सासरे दीर यांनी काळी जादू केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com