Sanjay Shirsat Son Controversy : बौद्ध पद्धतीनं लग्न, महिलेचा जबरदस्तीने गर्भपात,संपवण्याची धमकी; संजय शिरसाटांच्या पोराचा कारनामा उघड, VIDEO

Sanjay Shirsat son marriage : शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचे नवे कारनामे समोर आलेत. शिरसाटांच्या मुलावर एका महिलेनं शारिरीक छळाचा आरोप केलाय. सिद्धांत शिरसाट याने काय प्रताप केलेत पाहूयात...
Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat Son Controversy Saam tv
Published On

हा चेहरा नीट पाहा... हा आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट.....याच सिद्धांत शिरसाटने फसवणूक करुन मानसिक आणि शारिरिक छळ केल्याचा गंभीर आरोप महिलेनं केलाय.. मात्र हे आरोप काय आहेत? पाहूयात...

शिरसाटांच्या पोरावर महिलेचे आरोप

14 जानेवारी 2022 ला बौद्ध पद्धतीनं लग्न

सिद्धांतकडून महिलेचा जबरदस्तीने गर्भपात

पोलिसांकडे गेल्यास आत्महत्येची धमकी

महिलेचं कुटुंब गुंडांकडून संपवण्याची धमकी

संजय शिरसाटांनी राजकीय वजन वापरुन प्रकरण दाबलं

Sanjay Shirsat News
Reelstar shubham malve : चंगळ्या बोले कुहू! रिलस्टार शुभम माळवे अडचणीत, वकिलाने धाडली कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?

एवढंच नाही तर पीडित महिलेनं वकील चंद्रकांत ठोंबरेमार्फत सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस पाठवलीय...

खरंतर जान्हवी शिरसाट नावाच्या महिलेनं 5 महिन्यांपुर्वी सिद्धांत शिरसाटविरोधात पोलीसात तक्रार केली.. मात्र तब्बल 5 महिन्यानंतरही तक्रारीची दखलच घेतली नाही.. त्यामुळे मंत्र्यांसाठी एक आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा असा न्याय का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय...

मंत्र्यांच्या मुलाला वेगळा न्याय आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

एकनाथ शिंदेंचं नाव वापरुन धमक्या दिल्याचं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगतलं.

सामाजिक न्याय मंत्र्यांच्या घरातच महिलेला न्याय मिळत नसेल तर ही शोकांतिका आहे... कारण डिसेंबरमध्ये तक्रार झाल्यानंतरही हे प्रकरण धुळ खात पडून आहे... त्यावर साम टीव्हीने सवाल उपस्थित केलेत....

सामचे सवाल

- डिसेंबरमध्ये केस फाईल झाल्यानंतर कारवाई का नाही?

- पोलिसांवर कोणाचा दबाव होता?

- आरोप मागे घ्यायला संजय शिरसाटांनी दबाव आणला का?

- शिरसाट पूर्ण प्रकरणावर गप्प का?

- अद्याप सिद्धांतची चौकशी का झाली नाही?

Sanjay Shirsat News
Beed Police : बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ; पोलीस अधीक्षकांचा एक आदेश अन् पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

दुसरीकडे या प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीतही पडसाद उमटले...शिरसाट यांच्या मुलाकडे धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक कुठून आली? त्याच्याकडे बंदूकीचं लायसन्स आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले... त्यामुळे जगाला ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या घरातच महिलेला न्याय मिळत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com