Nilesh Chavan Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case: बलात्काराचा गुन्हा असताना निलेश चव्हाणने कसा मिळवला शस्त्रपरवाना? धक्कादायक माहिती उघड

Nilesh Chavan: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. निलेश चव्हाणवर बलात्काराचा गुन्हा दाखल असताना देखील त्याला शस्त्रपरवाना देण्यात आला होता.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बलात्कारसारखा गंभीर गुन्हा दाखल असताना सुद्धा आरोपी निलेश चव्हाणने राजकीय ओळखीचा वापर करून शस्त्रपरवाना मिळवला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी नकार दिल्यानंतर सुद्धा निलेश चव्हाणने पिस्तूल परवाना मिळवला. गुन्हा दाखल झाला असताना सुद्धा ही माहिती गृहराज्यमंत्री किंवा गृह विभागासमोर न ठेवता पोलिसांनी परवाना जारी केल्यामुळे निलेश चव्हाणने राजकीय ओळखीचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींसंदर्भात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या निलेश चव्हाणने पिस्तुल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांनी त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर निलेश चव्हाणने थेट गृह विभागात अपील केले होते. त्या वेळच्या गृह विभागाच्या समोर झालेल्या सुनावणीअंती त्याला शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय झाला होता.

दुसऱ्या बाजूला हे सर्व सुरू असताना निलेश चव्हाण याच्यावर पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. ही माहिती गृह विभागाला देणे आवश्यक असतानाही पुणे पोलिसांनी ही माहिती दडवली? की चव्हाणने त्याचे राजकीय कनेक्शन लावून थेट गृहविभागकडून परवाना मिळवला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

निलेश चव्हाणने परवाना मिळवण्यासाठी राजकीय क्षेत्रातील ओळख वापरल्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी आता वरिष्ठ स्तरावरून चौकशी होण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस शस्त्र परवाना देण्यामागे कोणाची भूमिका होती? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आता ही धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT