Nilesh Chavan Arrest: मोबाईल, ATMचा वापर कटाक्षानं टाळला; मागोवा घेणं कठीण, पोलिसांना निलेश चव्हाण कसा गावला?

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर फरार झालेला निलेश चव्हाण अखेर सापडला आहे. त्याला नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली. त्याचा शोध कसा घेण्यात आला याची माहिती जाणून घेऊ.
Nilesh Chavan Arres
Vaishnavi Hagawane Death Casesaam Tv
Published On

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. हुंडा आणि मानसीक छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केलीय. याप्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ बॉर्डरवरुन अटक करण्यात आलीय. निलेश चव्हाण याच्यावर कस्पटे कुटुंबियांना धमकवल्याचा आरोप आहे. सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणेसह सर्वांना अटक करण्यात आली. तर आरोपी निलेश चव्हाण हा फरार होता. पुण्यातील बावधन पोलिसांनी निलेशला बेड्या ठोकल्या.

निलेश पुण्यातून पसार होत नेपाळमध्ये पोहोचला होता. पोलिसांना निलेशमध्ये नेपाळमध्ये असल्याची माहिती होताच पोलिसांनी आपलं पथक रवाना करत त्याच्या मुसक्या आवळल्या. पुण्यातून पसार होताना निलेश एका सराईत गुन्हागाराप्रमाणे पोलिसांना गुंगारा देत होतो. जवळपास १० दिवसांपासन निलेश फरार होता. या दिवसात निलेश मोबाईल वा इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करत नव्हता.

निलेश चव्हाणवर आरोप काय?

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिची नणंद करिश्मा हगवणेने वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात दिलं होतं. कारण निलेश हा हगवणे कुटुंबाच्या निकटवर्तीय आहे. दरम्यान वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी बाळाचा शोध घेतला. तिचं बाळ निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती मिळताच वैष्णवीचे काका, मामा त्याच्या घरी गेले.

तेव्हा निलेशने त्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना हुसकावून लावलं. यानंतर वैष्णवीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. निलेश चव्हाणवर बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या अटक होणार असल्याची माहिती मिळताच निलेश चव्हाण हा पुण्यातून फरार झाला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

अटक होणार असल्याचं लक्षात येताच निलेशनं पुणे सोडलं. तो २१ मेपासून फरार होता. विविध राज्यातून प्रवास करत त्याने आंतरराष्ट्रीय सीमा गाठली. त्यानंतर तो नेपाळमध्ये पोहोचला. निलेश १० दिवसांपासून फरार होता. निलेश हा देश सोडून पळून जाईल, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली होती.

Nilesh Chavan Arres
Nilesh Chavan Arrest: पिंपरी-चिंचवडनंतर व्हाया कोकण; दिल्लीवरून रोडने प्रवास करत गाठली सोनौली बॉर्डर, निलेश असा झाला फरार

असा निसटला निलेश चव्हाण

निलेश सुरुवातीला पिंपरी-चिंचवडहून महाबळेश्वरला गेला. त्यानंतर तेथून कोकणात गेला. कोकणात त्याने काही दिवस वास्तव्य केलं. त्यानंतर तो परत मुंबईत आला. मुंबई हुन त्याने दिल्ली, असा रेल्वे प्रवास केला. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याने नेपाळपर्यंत जाण्यासाठी बसचा वापर केला. दिल्ली ते गोरखपूरपर्यंतचा प्रवास त्याने एका ट्रॅव्हल्सने प्रवास केला. त्यादरम्यान त्याने कोणत्याच इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर केला नाही. पोलिसांना आपला ठावठिकाणा समजून नये म्हणून त्याने प्रवास आणि राहण्याच्या ठिकाणी मोबाईल आणि एटीएमचा वापर कटाक्षाने टाळला.

पोलिसांना असा गावला निलेश चव्हाण

नेपाळच्या बॉर्डरवर पोहचल्यानंतर निलेश चव्हाण हा एका लॉजवर राहत होता. तेथेही तो मोबाईल आणि एटीएमचा वापर करणं टाळत होता. पोलिसांना त्याचा मागोवा घेणं कठीण जात होतं. कोकणात असताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांना समजलं होतं परंतु त्यानंतर त्याचे लोकेशन पोलिसांन मिळालं नव्हतं. निलेश हा एका लॉजवर राहत होता याची माहिती पोलिसांच्या एका खबऱ्याला मिळाली. त्यानंतर त्याने पोलिसांना निलेशचा पत्ता दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com