Vaishnavi Hagawane Case : पंखा वैष्णवीचं ७१ किलो वजन झेलू शकतो का? रुपाली चाकणकरांनी दिली महत्वाची माहिती

rupali chakankar on Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणावर रुपाली चाकणकरांनी महत्वाची माहिती दिली आहे. महिला आयोगाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
rupali chakankar News
rupali chakankar Saam tv
Published On

Vaishnavi Hagawane Case Update : वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे. त्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूवरही संशय व्यक्त केला जात आहे. बेडरुममध्ये आत्महत्या करणाऱ्या वैष्णवीचं ७१ किलो वजन पंखा झेलू शकतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर रुपाली चाकरणकरांनी महत्वाची माहिती दिली आहे.

rupali chakankar News
Vande Bharat First Sleeper Trains: मुंबईतून धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असेल मार्ग? जाणून घ्या

विधानभवनात आज नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची एक बैठक झाली. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. या बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर भाष्य केलं.सध्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला जात आहे. तिच्या बेडरुममधील पंखा वैष्णवीचं ७१ किलो वजन पेलू शकतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावर रुपाली चाकणकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'टीका-टिप्पणी होत असते. आपण सर्व जण एक होऊन वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करुयात. वैष्णवीच्या कुटुंबीयाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. पुन्हा वैष्णवी घडू नये, यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

rupali chakankar News
Maharashtra Politics : रायगडमध्ये महायुतीत 'बिघाडी'; तटकरे- गोगावलेंमध्ये पुन्हा जुंपली, पाहा व्हिडिओ

'या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे. आपण पोलिसांनाही सहकार्य करुयात. शेवटचा तपास पूर्ण झाल्यावर चार्जशीटमधून सर्वकाही समोर येईल. घटना कशी घडली. कोणी कोणाला सहकार्य केलं, कशा पद्धतीने हे घडलं? सर्व समोर येईल. या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणे महत्वाचे आहे,असे चाकणकर म्हणाल्या.

'महिला आयोग वैष्णवीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. या प्रकरणात लवकर चार्जशीट दाखल करावी, यासाठी आयोग पाठलाग करत आहे. या सर्व घटनेत पोलिसांचा तपास होणे महत्वाचे आहे. आयोग या प्रकरणात महत्वाची भूमिका निभावेल, असेही त्यांनी सांगितले.

rupali chakankar News
Gold Rate Today : खरेदीदारांना मोठा झटका! सोनं चकाकलं तर चांदीही महागली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

माजी सदस्यांचा नाराजीचा सूर

महिला आयोगाच्या माजी सदस्यांमध्ये नाराजी सूर उमटला आहे. यावर चाकणतकर म्हणाल्या की, 'नीलम गोऱ्हे यांनी ही बैठक आमंत्रित केली होती. सर्व भागात बैठका घेता येऊ शकतात. नीलम गोऱ्हे यांनी सर्वांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. काही जण राहिल्या असतील. त्यांना पुढील बैठकीसाठी आमंत्रित केले जातील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com