Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Accident News : कार अन् स्कुटीच्या धडकेत आई-वडिलांचा जागीच मृत्यू; २ वर्षांची चिमुकली गंभीर जखमी

Car and Bike Accident : चिमुकली बचावली असली गंभीर जखमी झालेय. अपघातानंतर कार चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Ruchika Jadhav

सिद्धेश म्हात्रे

Uran Accident News :

उरणमध्ये अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर एका भरधाव वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिलीये. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांची २ वर्षांची लहान मुलगी जखमी झाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पवित्र बराल आणि रश्मिता बराल अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या अपघातात त्यांची चिमुकली बचावली असली गंभीर जखमी झालेय. अपघातानंतर कार चालकाने तेथून पळ काढलाय. पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या रस्त्यावर कार चालक फार वेगात वाहन चालवत होता. तितक्यास समोरून बराल दाम्पत्य आपल्या मुलीसोबत स्कुटीवरून जात होते. समोरून एवढ्या मोठ्याप्रमाणात भरधाव कार आल्याने काही करण्याआधीच कारची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.

यामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तर पती-पत्नी आणि त्यांची मुलगी दोघेही उडून खाली पडले. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर सर्वांनी घोळका केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी कार चालकाने यावेळी तेथून पळ काढला. तसेच त्याला आडवणाऱ्या व्यक्तींना मारहाण आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी वाहन चालक जय घरत विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Naneghat Waterfalls: मुसळधार पावसाने खुललं नाणेघाटाचं सौंदर्य; धबधबे, धुकं अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Heavy Rain: रायगड जिल्ह्यात मुसळधार, अंबा नदीनं ओलांडली धोका पातळी; पोलादपुरात दरड कोसळली, नागरिकांचं स्थलांतर

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

SCROLL FOR NEXT