Crime News: खंडणी द्या, अन्यथा किडनी विकू; अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Indian Student Killed: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे.
Indian Student Killed
Indian Student KilledYandex

Crime News Indian Student Killed In US

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे. मागील महिन्यात बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफत याचा मृतदेह सापडला आहे. मोहम्मद अब्दुल अराफात याचा मृतदेह अमेरिकेतील क्लीव्हलँड येथून सापडला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची आठवड्याभरातील ही दुसरी घटना (Indian Student Killed In US) आहे. मोहम्मद अब्दुल अराफत हा हैदराबाद येथील नचारामचा रहिवासी होता. तो गेल्या वर्षी मे महिन्यात क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटीमध्ये मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेत गेला होता.  (Latest Marathi News)

अराफतचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितलं की, त्यांचं 7 मार्च रोजी अराफातशी शेवटचं बोलणं झालं होतंय त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नव्हता. त्याचा मोबाईलही बंद (Indian Student Killed) होता. अराफतसोबत राहणाऱ्या तरुणाने अराफतच्या वडिलांना पोलिसांत हरवल्याची तक्रार केल्याचं सांगितलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

19 मार्च रोजी अराफातच्या कुटुंबाला एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. अराफातचे एका ड्रग्ज विकणाऱ्या टोळीने अपहरण केलं होतं. त्याच्या सुटकेसाठी 1,200 अमेरिकन डॉलरची खंडणी मागितली (Crime News) होती. अराफतच्या वडिलांनी सांगितलं की, 'कॉल करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली होती की, जर खंडणीचे पैसे दिले नाहीत, तर तो अराफतची किडनी विकेल.'

त्यांनी कॉलरला पैसे कसे भरायचे विचारले, तेव्हा त्याने कोणतीही मागणी दिली नाही. त्याने अराफतशी बोलण्याची मागणी केली असता नकार दिला होता. अराफतचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर (crime) कोसळला आहे. गेल्या आठवड्यातही भारतीय विद्यार्थिनी उमा सत्यसाई गडदे हिचा ओहायो येथे मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची देखील चौकशी सुरू आहे.

Indian Student Killed
Vasai Crime News : तीन वर्षांपासून फरार खुनातील आरोपी अखेर ताब्यात; प्रेयसीच्या पतीची केली होती हत्या

न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोहम्मद अराफतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वाणिज्य दूतावासाने लिहिलंय की, 'बेपत्ता झालेला मोहम्मद अब्दुल अराफात (Indian Student) ओहायोतील क्लीव्हलँड येथे मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे अतिशय दुःख झाले आहे.

वाणिज्य दूतावासाने सांगितलं की, या प्रकरणी मृत्यूची चौकशी करण्यासाठी ते स्थानिक एजन्सींच्या संपर्कात आहेत. वाणिज्य दूतावासाने सांगितल की, पार्थिव भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत. मागील महिन्यात दूतावासाने सांगितले होते की, ते बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी कायदेशीर संस्थांसोबत काम करत आहेत.

Indian Student Killed
Pune Crime News : मित्राच्या मदतीने मुलीने आईची केली हत्या; थरारक घटनेनं पुणे हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com