Vasai Crime News : तीन वर्षांपासून फरार खुनातील आरोपी अखेर ताब्यात; प्रेयसीच्या पतीची केली होती हत्या

Vasai News : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर ३ सप्टेंबर २०२१ ला एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Vasai Crime News
Vasai Crime NewsSaam tv
Published On

महेंद्र वानखेडे
वसई
: प्रेम संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रेयसीच्या पतीची हत्या करून तीन वर्षांपासून फरार असलेल्या (Vasai) आरोपीला पेल्हार गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अटक केली आहे. फरार आरोपीने ३ सप्टेंबर २०२१ रोजी हत्या (Crime News) करून मुंबई- अहमदाबाद महामार्गवर मृतदेह फेकला होता. (Latest Marathi News)

Vasai Crime News
Palghar News : भीषण पाणी टंचाईत कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया; कोकण पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर ३ सप्टेंबर २०२१ ला एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी विरार पोलिस (Virar Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र विरार पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचता आले नाही. दरम्यान ३ एप्रिल २०२४ रोजी पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तीच्या घरी धारधार तलवार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पेल्हार गुन्हे प्रकटीकरण कक्षाने छापा टाकला असता धारधार शस्त्र आढळून आले. यामध्ये दोन जणांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasai Crime News
Cyber Crime : ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीचे आमिष देत १३ लाखांचा गंडा

त्याने दिली खुनाच्या गुन्ह्याची कबुली 
ताब्यात घेतलेल्या आरोपी पोखन परण साव, अब्दुल मुबारकअली शाह उर्फ बद्द दोघेही रिक्षा चालक असून नालासोपारा पूर्वेला राहणारे आहेत. तलवार बाळगल्या प्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीकडे चौकशी केली असता २०२१ मध्ये आरोपी पोखन परण साव यांनी त्यांच्या प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्येत साव सहित आणखी दोन जण हत्येच्या कटात सहभागी असल्याचं समोर आले आहे. सदर मयत व्यक्ती अहमद बादशाह अहमद इद्रद्रीसी याला ३ एप्रिल २०२१ सायंकाळी साडे आठच्या सुमारास रिक्षात बसवून मुंबई- अहमदाबाद महामार्गावर जबरजस्तीने नेऊन हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com